Sambhal Mosque Dispute Case : संभल जामा मशीद सर्वे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

| Updated on: Nov 29, 2024 | 1:39 PM

Sambhal Mosque Dispute Case : अपील दाखल झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत सुनावणी करा, असं सुप्रीम कोर्टाने अलहाबाद हाय कोर्टाला सांगितलं आहे. आम्हाला शांतता आणि सदभाव हवा असं कोर्टाने स्पष्ट केलय. आम्हाला सत्र न्यायालयाच्या आदेशावर काही आक्षेप आहेत असं सीजेआयने सांगितलं.

Sambhal Mosque Dispute Case : संभल जामा मशीद सर्वे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश
Sambhal Mosque Dispute Case
Follow us on

संभल जामा मशीद सर्वे करण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कोर्टाने मशीद कमिटीला सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हाय कोर्टात अपली करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकरण हाय कोर्टात असेपर्यंत सत्र न्यायालयाने कुठलेही आदेश देऊ नयेत, असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने एडवोकेट कमीशनला आपला सर्वे रिपोर्ट बंद लिफाफ्यातून जमा करण्यास सांगितला आहे. सुप्रीम कोर्ट या प्रकरणी पुढील सुनावणी 6 जानेवारीला करणार आहे.

CJI संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालीला दोन सदस्यीय पीठाने या प्रकरणी सुनावणी केली. सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवले आहेत. मशिदीच्या सर्वेसंबंधी 8 जानेवारीपर्यंत कुठलेही पुढचे आदेश देऊ नका असं सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला सांगितलं आहे. सत्र न्यायालयात या प्रकरणी पुढील सुनावणीसाठी 8 जानेवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. शुक्रवारी म्हणजे आज 29 नोव्हेंबरला सर्वे रिपोर्ट सादर होणार होता. पण तो रिपोर्ट सादर झाला नाही. आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एडवोकेट कमीशन सीलबंद लिफाफ्यातून हा रिपोर्ट सादर करेल.

हाय कोर्टाला किती दिवसांच्या आत सुनावणी करण्याचे निर्देश?

अपील दाखल झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत सुनावणी करा, असं सुप्रीम कोर्टाने अलहाबाद हाय कोर्टाला सांगितलं आहे. आम्हाला शांतता आणि सदभाव हवा असं कोर्टाने स्पष्ट केलय. आम्हाला सत्र न्यायालयाच्या आदेशावर काही आक्षेप आहेत असं सीजेआयने सांगितलं. हिंदू पक्षकाराचे वकील विष्णु जैन यांनी सत्र न्यायालयात पुढील सुनावणी 8 जानेवारीला असल्याची माहिती दिली. मुख्य न्यायाधीशांनी संभल जिल्हा प्रशासनाला शांतता आणि सदभाव सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.

शाही जामा मशीद कमिटीने याचिकेत काय म्हटलेलं?

शाही जामा मशिदीची देखभाल करणाऱ्या कमिटीने याचिकेत सिविल जजच्या 19 नोव्हेंबरच्या एकपक्षीय आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. समितीने सांगितलं की, 19 नोव्हेंबरला मशिदीत हरिहर मंदिर असल्याचा दावा करणारी याचिका संभल कोर्टात दाखल झाली. त्याचदिवशी सीनियर डिविजनचे सिविल जजने प्रकरणाची सुनावणी केली. मशिद समितीची बाजू ऐकून घेतल्याशिवाय सर्वेसाठी एडवोकेट कमिश्नरची नियुक्ती केली. एडवोकेट कमिश्नर 19 तारखेच्या संध्याकाळीच सर्वेसाठी पोहोचले. 24 नोव्हेंबरला सर्वे झाला.