भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संघाची पसंती कोणाला? मोदी-शाह यांची पसंती कोण?

| Updated on: Sep 26, 2024 | 8:49 PM

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे भाजपचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा आहे. संघटनेची धुरा कोणाकडे जाणार यावरुन चर्चेचा बाजार तापला आहे. संघाकडून एक नाव सुचवण्यात आले आहे तर दुसरीकडे मोदी - शाह यांची पंसती कोणाला आहे ते पण जाणून घ्या.

भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संघाची पसंती कोणाला? मोदी-शाह यांची पसंती कोण?
Follow us on

भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची जागा कोण घेणार? तिथे कोण असेल जो पहिल्या क्रमांकावर राहून संघटनेला आणखी बळ देईल? असे अनेक प्रश्न आहेत जे सध्या राजकीय वर्तुळापासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वाधिक चर्चेचा विषय आहेत. भाजपच्या अध्यक्षपदासाठी एक नाव अधिक चर्चेत आहे. राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षा होऊ शकतात अशी चर्चा आहे. त्यामुळे राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी वसुंधरा राजे यांच्या नावाला संघाची पहिली पसंती असल्याचे समोर येतंय. यामुळे वसुंधरा राजे यांच्या गोटात आनंदाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर वसुंधरा राजे यांचे आधीच अभिनंदन केलं जात आहे.

वसुंधरा राजे यांच्याशिवाय संजय जोशी यांचे नाव देखील संघाकडून पुढे करण्यात आले आहे. तर शिवराज सिंह चौहान यांचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पुढे केल्याचे सांगितले जात आहे. संघाकडून केवळ वसुंधरा राजे यांच्या नावाचा विचार केला जात आहे. त्यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

वसुंधरा राजे या राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिल्या आहेत. 2003 ते 2008 आणि 2013 ते 2018 या काळात त्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. वसुंधरा राजे यांनी केंद्रात देखील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आता सध्या त्यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवल्यास वसुंधरा राजे यांना येथे बढती मिळेल. राष्ट्रीय उपाध्यक्षातून त्या अध्यक्ष होणार आहेत.

वसुंधरा राजे 2023 मध्ये आमदार म्हणूनही निवडून आल्या आहेत. वसुंधरा राजे 5 वेळा लोकसभेच्या खासदार झाल्या आहेत. 1985 पासून ते सक्रिय राजकारणात आहेत. वसुंधरा राजे यांचा जन्म ८ मार्च १९५३ रोजी झालाय. त्या राजमाता विजया राजे सिंधिया यांच्या कन्या आहेत. त्यांचा मुलगा दुष्यंत सिंग हा झालावाड-बारण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहे.