Cardamom | या 4 कारणांमुळे इलायची खावी, वाचा फायदे!
आपण नेहमीच इलायची मिठाईमध्ये किंवा एखाद्या पदार्थात खातो. इलायची आपण कधी वेगळी खात नाही. पण काहीजण असे आहेत जे जेवणानंतर इलायची खातात. इलायची खाण्याचा काय फायदा आहे? आरोग्याला त्याचा काय फायदा? नेमकं त्याने काय होतं...बघुयात
1 / 5
इलायची सहसा पुलाव, हलवा, बिर्याणी, मिठाईमध्ये वापरली जाते. इलायचीची चव खूप छान लागते. याने पदार्थांचा स्वाद वाढतो. पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे हे घटक इलायची मध्ये असतात. पण यासोबतच इलायचीचे आणखी सुद्धा फायदे आहेत. काय आहेत जाणून घेऊयात...
2 / 5
तुम्ही बरेचदा पाहिलं असेल की काही लोक जेवणानंतर सुद्धा इलायची खाणं पसंत करतात. यामागे कारण काय? इलायची पोटाच्या समस्यांवर गुणकारक आहे. पोटात गॅस होणे, पचन चांगले न होणे, सूज येणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात या समस्या इलायची खाल्ल्याने दूर होऊ शकतात. त्यामुळे जेवणानंतर तुम्ही इलायची तोंडात ठेऊन चघळू शकता.
3 / 5
बडीशेप, इलायची हे नैसर्गिक माऊथफ्रेशनर म्हणून खाल्ले जाते. या दोन्हीचा पचनासाठी चांगला उपयोग होतो पण या सगळ्याच्या आधी इलायची एक नैसर्गिक माऊथ फ्रेशनर आहे. तोंडाची जर दुर्गंधी येत असेल तर इलायची नियमित चघळून खा.
4 / 5
इलायची खाल्ल्यानं हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. रक्ताभिसरण सुरळीत होते आणि याशिवाय इलायची रक्त पातळ करण्यास मदत करते. रक्त पातळ असल्यास रक्ताभिसरण चांगले होते, रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत.
5 / 5
eating elaichआजकाल शरीर डिटॉक्स करण्याचे अनेक मार्ग शोधले जातात. डिटॉक्स करणं म्हणजे काय? हे कार्य मूत्रपिंडाशी संबंधित असते. लघवीचा प्रवाह वाढला की मूत्रपिंडाचे काम सुरळीत राहते आणि शरीर व्यवस्थित डिटॉक्स होते. इलायची खाल्ल्याने लघवीचा प्रवाह वाढेल आणि शरीर डिटॉक्स होईल. i