चाहत्यांना का आवडतोय ‘मुंज्या’चा थरार? सिनेमाच्या यशाची 3 मोठी कारणं
अभय वर्मा आणि शर्वरी वाघ स्टारर 'मुंज्या' सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या आवडीस उतरत आहे. 7 जून रोजी प्रदर्शित झालेला 'मुंज्या' सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. दोन आठवड्यात सिनेमाने 67.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
1 / 10
दोन आठवठ्यात 67.95 कोटी रुपयांची कमाई करणारा 'मुंज्या' सिनेमाना 100 कोटी रुपयांचा गल्ला पार करतो की, नाही पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.
2 / 10
प्रेक्षक दुसरा कोणता नाहीतर, 'मुंज्या' सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. तर 'मुंज्या' सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई का करत आहे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. त्यामागचं कारण जाणून घेऊ...
3 / 10
बॉलिवूडमध्ये कॉमेडी - हॉरर सिनेमांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो. असं अनेक सिनेमांमध्ये पाहाण्यात आलं आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा स्त्री, जान्हवी कपूर हिचा 'रुही' सिनेमांना चाहत्यांनी प्रेम दिले.
4 / 10
असंच काही 'मुंज्या' सिनेमासोबतदेखील झालं आहे. कॉमेडी - हॉरर आता प्रेक्षकांसाठी आवडता जॉनर ठरत आहे. हॉरर सिनेमांना चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. सध्या सर्वत्र 'मुंज्या' सिनेमाची चर्चा रंगली आहे.
5 / 10
अभिनेता हृतिक रोशन स्टारर 'क्रिश' सिनेमाला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. 'क्रिश' सिनेमा 'कोई मिल गया' सिनेमाचा दुसरा भाग आहे. सिनेमात जादू या भूमिकेने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतंल. 'जादू' मुळेच सिनेमाचं महत्त्व वाढलं.
6 / 10
असंच काही 'मुंज्या' सिनेमासोबत देखील आहे. सिनेमात एक एनिमेटेड कॅरेक्टर आहे. ज्याने लोकांची उत्सुकता वाढली असून त्याचा फायदा बॉक्स ऑफिसवर होताना दिसत आहे.
7 / 10
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार कमी बजेटमध्ये सिनेमा तयार करण्यात आला आहे. फक्त 20 कोटीमध्ये सिनेमा तयार झाला आहे. तर सिनेमाने जवळपास 70 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
8 / 10
सिनेमाची कमाई दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कमी बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या दमदार कथेला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मुंज्याने आतापर्यंत जगभरात 83.46 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
9 / 10
सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळत आहे. 'मुंज्या' हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.
10 / 10
सिनेमाचे डिजिटल राइट्स हॉटस्टारने विकत घेतले आहेत. दोन महिन्यांनंतर हा सिनेमा ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. लवकरच घरबसल्या चाहत्यांना 'मुंज्या' सिनेमा पाहाता येणार आहे.