रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे आरोग्यदायी आहे का? वाचा
दूध आरोग्यासाठी उत्तम असतं हे तर आपण नेहमीच ऐकतो. पण दूध झोपताना पिणे योग्य आहे का? योग्य आहे तर का योग्य आहे? अयोग्य आहे तर का अयोग्य आहे? झोपण्याआधी नेमकं किती आधी दूध प्यावं? थंड प्यावं की गरम? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे
1 / 5
दुधात लॅक्टोस आणि प्रथिने असतात, शरीराला याची गरज असली आणि ते उपयुक्त जरी असले तरी रात्रीच्या वेळी दुधामधील प्रथिने आणि लॅक्टोस झोपेत अडथळा निर्माण करू शकतात. ही समस्या काही व्यक्तींनाच येते. त्यामुळे बरेचदा रात्री दूध पिऊ नका असं सांगितलं जातो.
2 / 5
झोपेच्या आधी जर दूध प्यायलं तर यकृताचे कार्य मंदावते. रात्री झोपेच्या वेळी शरीरात नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन होत असते. रात्री झोपण्याआधी दूध प्यायल्यास शरीराच्या कार्यात अडथळा येतो.
3 / 5
काही व्यक्तींना झोपेआधी दूध पिणे सहनच होत नाही. झोपण्यापूर्वी थंड दूध पिऊ नये. आरोग्यतज्ञ कधीच रात्री थंड दूध प्यायचा सल्ला देत नाहीत.
4 / 5
काही न्यूट्रिशनिस्टचं असं म्हणणं आहे की रात्री दूध प्यायल्याने पचनात व्यत्यय निर्माण होऊ शकतो. आपण जेवल्यानंतर पचनक्रिया सुरु होते त्यात झोपताना जर आपण दूध प्यायलं तर या पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो त्यामुळे झोपण्याधी दूध पिणे टाळावे.
5 / 5
प्रोटीन, लॅक्टोस आणि कॅलरी हे सगळं दुधात असतं. जर सकाळी दूध प्यायलं तर वजन वाढण्याची शक्यता कमीच असते. पण एक ग्लास दुधात जर 120 कॅलरी असल्या आणि त्यानंतर जर शरीराची काहीच हालचाल झाली नाही तर नक्कीच वजन वाढणार. झोपताना पुरेश्या कॅलरीज बर्न होत नाहीत त्यामुळे झोपताना दूध पिऊ नये नाहीतर वजन वाढेल.