Skin care tips | डेड स्किन काढण्यासाठी हे घरगुती स्क्रब अत्यंत फायदेशीर, वाचा!
ओटस आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते. ओटसचा स्क्रब घरी तयार करण्यासाठी ओटसमध्ये कोरफडचे जेल मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावा. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. या स्क्रबमुळे त्वचेवरील घान निघून जाण्यास मदत होते. ग्रीन टी स्क्रबमुळे त्वचेला अनेक प्रकारे फायदा होतो. सेबमचे जास्त उत्पादन कमी करण्यास ग्रीन टी मदत करते. ग्रीन टीचा स्क्रब घरी तयार करण्यासाठी ग्रीन टीची काही पाने पाण्यात उकळून घ्या आणि त्यामध्ये गुलाब जल मिक्स करून चेहऱ्याला लावा.