PHOTO | आता घरी घेऊन या रंगीबेरंगी-स्टायलिश गॅस सिलेंडर, वजनाने हलके आणि वापरण्यासही सुरक्षित!
आता वजनाला हलके आणि छान रंगीबेरंगी एलपीजी गॅस सिलेंडर आपल्या स्वयंपाकघरात अवतरणार आहे. इंडेनने फायबरपासून बनवलेले 5 किलो आणि 10 किलो एलपीजी सिलेंडर लाँच केले आहेत. हे सुरक्षित असण्याबरोबरच वजनाने देखील हलके आहेत.
1 / 5
आता वजनाला हलके आणि छान रंगीबेरंगी एलपीजी गॅस सिलेंडर आपल्या स्वयंपाकघरात अवतरणार आहे. इंडेनने फायबरपासून बनवलेले 5 किलो आणि 10 किलो एलपीजी सिलेंडर लाँच केले आहेत. हे सुरक्षित असण्याबरोबरच वजनाने देखील हलके आहेत. सध्याच्या लोखंडी सिलेंडरमध्ये 14.2 किलो गॅस असतो. पाच किलोचे छोटे गॅस सिलेंडर आधीच उपलब्ध असले, तरी फायबरचे बनलेले कम्पोजिट सिलेंडर पहिल्यांदाच लोकांच्या स्वयंपाकघरात पोहोचणार आहेत.
2 / 5
सध्याच्या लोखंडी गॅस सिलेंडर्सपेक्षा ते 50 टक्क्यांपर्यंत हलके असतील. तसेच याची रचना आकर्षक दिसेल. या सिलेंडरमध्ये अजिबात गंज लागणार नाही. सध्याच्या लोखंडी सिलेंडरमध्ये गंज लागण्याची शक्यता जास्त असते.
3 / 5
सध्या हे सिलेंडर फक्त दिल्ली आणि हैदराबादमध्ये उपलब्ध आहे. आपण देखील हे सिलेंडर घेऊ इच्छित असल्यास, आपण आपल्या जवळच्या इंडेन वितरकाशी संपर्क साधून त्याबद्दल माहिती मिळवू शकता.
4 / 5
फायबरपासून बनवलेल्या कम्पोजिट सिलेंडर्समध्ये जास्तीत जास्त 10 किलो गॅस असेल. सिलेंडरचे काही भाग पारदर्शक असतील, जेणेकरून आपणास सिलेंडरमध्ये किती गॅस उरला आहे, हे सहजपणे दिसून येईल. आपण खरेदीच्या वेळी गॅसची पातळी पाहून देखील खरेदी करू शकता.
5 / 5
Indian Oil Indane Chhotu 5 Kg Cylinder