Marathi News Photo gallery Pandharpur Kartiki Ekadashi 2023 Mahapooja Vithhal Mandir Sajawat Chandrabhaga River Latest Marathi News
कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची आरास; चंद्रभागेतीरी भाविकांची गर्दी
Pandharpur Kartiki Ekadashi 2023 Mahapooja Vithhal Mandir Sajawat : आज कार्तिकी एकादशी आहे. त्यानिमित्त विठ्ठल भक्त पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. पंढरीनगरीत जय हरी विठ्ठलचा जयघोष पाहायला मिळतोय. विठ्ठल रुक्मिणी मंदिरालाही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
1 / 5
आज कार्तिकी एकादशी आहे. त्यानिमित्त विठूरायाची पंढरीनगरीत भाविकांनी गर्दी केली आहे. अवघी पंढरीनगरी विठ्ठल भक्तीत नाहून निघाली आहे.
2 / 5
कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. मंदिरावर विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली आहे.
3 / 5
कार्तिकी एकादशी सोहळा म्हणजे लाडक्या विठूरायाच्या भक्तीत तल्लीन होण्याचा दिवस... त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक पंढरी नगरीत दाखल झाले आहेत.
4 / 5
चंद्रभागा नदीच्या किनारीही भक्तांनी गर्दी केली आहे. चंद्रभागेत स्नान करून नामदेव पायरीच्या दर्शन करत वारकरी कृतकृत्य होतात.
5 / 5
कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्रा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यंदा नाशिकच्या घुगे दाम्पत्याला मानाचे वारकरी होण्याचा मान मिळाला.