Ben Stokes | बेन स्टोक्स याच्या एका कॅचमुळे दोघांना मिळाला नवा पार्टनर, इंग्लंड कॅप्टनचा मोठा रेकॉर्ड

| Updated on: Jul 30, 2023 | 11:44 AM

Ben Stokes Record | इंग्लंड क्रिकेट टीमचा कॅप्टन बेन स्टोक्स याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठा रेकॉर्ड दिग्गांसोबत जाऊन बसला आहे.

1 / 6
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात कॅप्टन बेन स्टोक्स याने मोठा रेकॉर्ड केला आहे. स्टोक्सने यासह दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवलंय.

2 / 6
स्टोक्सने जो रुट याच्या बॉलिंगवर एलेक्स कॅरी याचा कॅच घेतला.  स्टोक्सच्या कसोटी कारकीर्दीतील हा 100 वा कॅच ठरला. स्टोक्सने यासह विंडिजचे माजी दिग्गज गॅरी सोबर्स आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार ऑलराउंडर जॅक कॅलिस याच्या विक्रमाची बरोबरी केली.

3 / 6
स्टोक्स कसोटी क्रिकेटमध्ये 6 हजार धावा, 100 विकेट्स आणि 100 पेक्षा अधिकस कॅच घेणारा तिसरा खेळाडू ठरला. स्टोक्सच्या नावावर कसोटीत  97  सामन्यांमध्ये 6 हजार 75 धावा,  197 विकेट्स आणि 101 कॅचची नोंद आहे.

4 / 6
विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे 28 जुलै रोजी गॅरी सोबर्स यांचा 87 वा वाढदिवस होता. स्टोक्सने सोबर्स यांच्या वाढदिवशीच ही कामगिरी केली.  सोबर्स यांनी 93 कसोटीत 8 हजार 32 धावा केल्या. तसेच 109 कॅच आणि 235 विकेट्स घेतल्या होत्या.

5 / 6
तसेच जॅक कॅलिस याने 166 कसोटीत 13 हजार 289 धावा केल्या आहेत. तर 292 विकेट्ससह 200 कॅच घेतल्या आहेत.

6 / 6
इतकंच नाही, तर स्टुअर्ट ब्रॉड यानेही खास विक्रम केलाय. स्टुअर्ट ब्रॉड अ‍ॅशेस सीरिजमध्ये 150 विकेट्स घेणारा तिसरा आणि इंग्लंडचा पहिला बॉलर ठरला. उस्मान ख्वाजा हा स्टुअर्टचा अ‍ॅशेसमधील 150 वा शिकार ठरला.