WPL 2024 : एलिस पेरीला टाटा कंपनीने दिलं खास गिफ्ट, षटकार मारत तोडली होती गाडीची काच
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या ११ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स यांच्यात रंगला होता. या सामन्यात एलिस पेरीच्या षटकाराची चर्चा चांगलीच रंगली होती. उत्तुंग षटकार मारत एलिस पेरीने टाटा पंच इव्हीची काच फोडली होती. त्यानंतर सोशल मीडियावर या षटकाराची चांगली चर्चा रंगली होती.
1 / 5
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची एलिस पेरी चांगल्याच फॉर्मात आहे. बंगळुरुच्या विजयात तिची मोलाची साथ आहे. तिच्या खेळीमुळेच बंगळुरुला अंतिम फेरी गाठता आली आहे.या स्पर्धेतील तिच्या खेळीचं सर्वत्र कौतुक होत आहे. खासकरून षटकार मारून गाडीची काच फोडल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
2 / 5
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील ११ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स यांच्यात रंगला. या सामन्याचं १९ वं षटक दीप्ती शर्मा टाकत होती आणि समोर एलिस पेरी होती. तिने चेंडू उंच फटकावला आणि थेट टाटा पंच गाडीची मागच्या सीटजवळील काच फोडली.
3 / 5
आता टाटा कंपनीने फुटलेल्या गाडीच्या काचेची फ्रेम केली आहे. तसेच ही फ्रेम एलिस पेरी गिफ्ट म्हणून दिली. ही फ्रेम पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. हे गिफ्ट घेताना तिला आपलं हसू आवरत नव्हतं.
4 / 5
एलिस पेरीने प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात ६६ धावांची जबरदस्त खेळी केली. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला १३५ धावा करता आल्या आणि विजयासाठी १३६ धावांचं आव्हान देता आलं. पेरी व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही.
5 / 5
दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ रविवारी (17 मार्च) दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर होणाऱ्या महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात आमनेसामने येतील. दोन्ही संघ प्रथमच ट्रॉफी जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहेत. आता विजयालक्ष्मी कोण जिंकणार हे पाहायचे आहे.