WPL 2024 : मुंबई इंडियन्स की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु! अंतिम फेरीत दिल्लीशी सामना कोण करणार?

| Updated on: Mar 14, 2024 | 4:56 PM

वुमन्स लीग स्पर्धेतील जेतेपदासाठी अवघे दोन सामने शिल्लक आहेत. जेतेपदासाठी दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चुरस आहे. दिल्ली कॅपिटल्सने थेट अंतिम फेरी गाठली आहे. तर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात बाद फेरीचा सामना होणार आहे.

1 / 5
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने संपले आहेत. युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता टॉप 3 संघात आता जेतेपदासाठी चुरस आहे. बाद फेरीनंतर अंतिम फेरीचा सामना होणार आहे.

2 / 5
गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने थेट अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला असून 12 गुण मिळवले आहेत. गेल्या वर्षीही दिल्ली कॅपिटल्सने थेट अंतिम फेरी गाठली आहे.

3 / 5
मुंबई इंडियन्सने 8 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 8 पैकी 4 सामन्यात विजय मिळवून 8 गुणांसह तिसरं स्थान गाठलं आहे. त्यामुळे बाद फेरीत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होणार आहे.

4 / 5
बाद फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स 15 मार्च रोजी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर आमनेसामने येतील. हा सामना संध्याकाळी 7.30 पासून सुरू होईल.

5 / 5
अंतिम सामना 17 मार्च रोजी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर खेळवला जाईल. रविवारी होणाऱ्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स सहभागी होणार आहेत. एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघ अंतिम लढतीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे.