मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरला आपल्यासोबत जोडलंय.
निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकर याची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे. सचिन तेंडुलकर याची जनमानसात असलेली प्रतिमेचा फायदा करुन मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी निवड आयोगाने हा निर्णय घेतलाय.
त्यामुळे आता येत्या काळात सचिन तेंडुलकर देशभरात निवडणूक आयोगाचा चेहरा असणार आहे.
सचिन तेंडुलकर याची क्रिकेट कारकीर्द ही 24 वर्षांची राहिली. त्यानंतर सचिन तेंडुलकर याने अनेक भूमिका बजावल्या.
सचिन तेंडूलकर सोशल मीडियावर सक्रीय असतो. सचिनचे असंख्य फॉलोवर्स आहेत, या कारणामुळेच निवडणूक आयोगाने सचिनची निवड केली आहे.
पुढच्या वर्षी 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी निवडणूक आयोगाकडून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी सचिनचा कसा उपयोग करुन घेते, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.