सतत होते चिडचिड, मूड बिघडतो ? सेरोटोनिनची असू शकते कमी, ‘हे’ पदार्थ खाल तर हॅपी व्हाल
सतत चिडचिड होणे, राग येणे यांसारख्या समस्यामुळे त्रस्त असाल तर तुमच्या शरीरात सेरोटोनिन हार्मोनची कमतरता असू शकते. काही पदार्थांचे सेवन केल्याने मूड बदलू शकतो.
1 / 6
चिडचिड, राग, नैराश्य, मूड बदलणे यासारख्या समस्यांमुळे तुम्ही सतत त्रस्त आहात का? इच्छा असूनही तुम्ही आनंदी राहू शकत नाही का? याचं उत्तर हो असेल, तर तुमच्या शरीरात सेरोटोनिन हार्मोनची कमतरता असू शकते. सेरोटोनिन हार्मोन तुमची मनःस्थिती, झोप, भूक, स्मरणशक्तीशी संबंधित कार्ये नियंत्रित करण्यासाठी कार्य करते. सेरोटोनिन हे एक प्रकारचे ब्रेन केमिकल आहे. त्याच्या कमतरतेमुळे मूड प्रभावित होऊ शकतो, ताण वा डिप्रेशन येऊ शकते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, सेरोटोनिनची मात्रा वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्याने मूड सुधारू शकतो. ते पदार्थ कोणते ते जाणून घेऊया.
2 / 6
केळं - केळ्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ॲसिड असते. आपले शरीर 5-HTP तयार करण्यासाठी ट्रिप्टोफॅन वापरते. हे संयुग सेरोटोनिन आणि मेलाटोनिन बनवते. ते मूड आणि झोपेचे नियमन करतात. जर तुमची झोप चांगली झाली असेल तर दिवसभर मूड चांगला राहतो आणि तुम्हाला चांगले वाटते. म्हणून तुम्ही केळ्याचे नियमितपणे सेवन करू शकता
3 / 6
बदाम - बदामामध्ये फोलेट, मॅग्नेशिअम व अनेक पोषक घटक असतात. मॅग्नेशिअमचे सेवन केल्याने शरीरातील सेरोटोनिनचे उत्पादन वाढते, ज्याचे तुमच्या मेंदूमध्ये आनंदाची भावना निर्माण करण्यात प्रमुख योगदान असते. बदामामध्ये व्हिटॅमिन बी 2 आणि ई देखील भरपूर असतात, जे तणावाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
4 / 6
गाईचं दूध - गाईच्या दुधात ट्रिप्टोफॅन असते, जो एक प्रकारचा अमिनो आम्ल आहे. हे सेरोटोनिन तयार करते. हे झोपेचे स्वरूप आणि मूड नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. गाईच्या दुधाच्या सेवनाने तुम्ही शरीरातील सेरोटोनिन हार्मोनची कमतरता दूर करू शकता. याचे सेवन केल्याने हाडेही मजबूत होतील. तसचे शरीरातील कॅल्शिअमची कमतरता दूर होईल.
5 / 6
अननस - अननसामध्येही भरपूर ट्रिप्टोफॅन देखील असते, जे मेंदूमध्ये सेरोटोनिनला प्रोत्साहन देते. याव्यतिरिक्त, अननसामध्ये ब्रोमेलेन प्रोटीन असते, जे शक्तिशाली दाहक-विरोधी गुणधर्मांनी भरलेले असते. अननस खाल्ल्याने शरीरातील सेरोटोनिनची कमतरता दूर होते व तुमचा मूड चांगला होतो. तसेच त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. जळजळ कमी होते.
6 / 6
सोया प्रॉड्क्टस - याशिवाय तुम्ही सोया प्रॉड्क्टसचेही सेवन करू शकता. त्यात देखील ट्रिप्टोफॅन असते, जे शरीरातील सेरोटोनिनची पातळी वाढवते. टोफू खाऊ शकता.