‘रोहित पवार यांच्या मेंदूमध्ये 50 टक्के शेण भरलेलं’, अजित पवार गटाच्या आमदाराचे जिव्हारी लागणारे शब्द

"रोहित पवार यांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 टक्के शेण भरलेलं दिसेल. त्यामुळेच ते बालिशप्रमाणे वक्तव्य करत आहेत" अशी अजित पवार गटाच्या नेत्याने बोचरी टीका केली आहे.

'रोहित पवार यांच्या मेंदूमध्ये 50 टक्के शेण भरलेलं', अजित पवार गटाच्या आमदाराचे जिव्हारी लागणारे शब्द
rohit pawar
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 1:01 PM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रोहित पवार यांनी अजित पवारांना सातत्याने टार्गेट केलं आहे. रोहित पवार हे अजित पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. रोहित पवार हे शरद पवारांसोबत आहेत. रोहित पवार हे 2019 साली पहिल्यांदा कर्जत-जामखेडमधून निवडून विधानसभेवर गेले. आता कर्जत-जामखेडमधून पुन्हा त्यांनाच मविआमधून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. रोहित पवार अजित पवारांवर टीका करतात. त्याचा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी समाचार घेतला आहे.

“रोहित पवार यांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 टक्के शेण भरलेलं दिसेल” अशी खोचक टीका आमदार अमोल मिटकरीं यांनी रोहित पवारावर केली. “रोहित पवार यांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 टक्के शेण भरलेलं दिसेल. त्यामुळेच ते बालिशप्रमाणे वक्तव्य करत आहेत” असं अमोल मिटकरी म्हणाले.

‘अजित पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं’

“रोहित पवारांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये. आपण स्वतःची लायकी तपासावी, जातीय अहंकार अंगात भरलेल्या बालिश व्यक्तींनी अजित पवारांवर बोलू नये आणि अजित पवार यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे होय” असही आमदार मिटकरी म्हणाले आहेत. ‘रोहित पवारांनी तोंडाचा पट्टा हा त्यांच्या पक्ष वाढीसाठी चालवावा’ असा सल्लाही मिटकरींनी दिला आहे.

'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'
'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'.
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?.
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका.
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर..
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर...
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी.
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका.
'दादा गुलाबी झाले तरी...', अजित पवार यांच्यावर कोणाचा निशाणा?
'दादा गुलाबी झाले तरी...', अजित पवार यांच्यावर कोणाचा निशाणा?.
म्हणून ABVPचा सुपडासाफ, सिनेट निवडणुकीवरुन राऊतांकडून सरकारला लक्ष्य
म्हणून ABVPचा सुपडासाफ, सिनेट निवडणुकीवरुन राऊतांकडून सरकारला लक्ष्य.
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर खरा की खोटा? जितेंद्र आव्हाडांकडून ऑडिओ ट्विट
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर खरा की खोटा? जितेंद्र आव्हाडांकडून ऑडिओ ट्विट.
आनंद दिघेंच्या मृत्यूवरून पुन्हा सवाल, शिरसाटांचा मोठा दावा अन नवा वाद
आनंद दिघेंच्या मृत्यूवरून पुन्हा सवाल, शिरसाटांचा मोठा दावा अन नवा वाद.