कुस्तीपटू महावीर फोगाटांचा मुलगी बबितासह भाजपमध्ये प्रवेश
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. दंगल गर्ल (Dangal Girl) म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुस्टीपटू बबिता फोगाटने (Babita Phogat) आपले वडील महावीर फोगाट (Mahavir Phogat) यांच्यासह भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे.
चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. दंगल गर्ल (Dangal Girl) म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुस्टीपटू बबिता फोगाटने (Babita Phogat) आपले वडील महावीर फोगाट (Mahavir Phogat) यांच्यासह भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या आधी दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाला (JJP) धक्का बसला आहे.
महावीर फोगाट याआधी जेजेपीत होते. सोमवारी (12 ऑगस्ट) त्यांनी जेपीपीला रामराम करुन केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थित भाजप प्रवेश केला. यावेळी भाजप नेते अनिल जैन, रामविलास शर्मा आणि अनिल बलूनी हे देखील उपस्थित होते. आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीत बबिता फोगाटला भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याचेही बोलले जात आहे.
Delhi: Wrestler Babita Phogat and her father Mahavir Singh Phogat join Bharatiya Janata Party in the presence of Union Minister Kiren Rijiju. pic.twitter.com/p4itp7hxMX
— ANI (@ANI) August 12, 2019
कलम 370 नुसार असलेला जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर बबिता फोगाटने भाजप सरकारची प्रशंसा केली होती. तिने भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एक भाषण देखील रिट्वीट केले होते. यात शाह यांनी कलम 370 हटवण्याबाबत आपल्या मनात कोणताही संभ्रम नव्हता असं म्हटलं होतं. शाह यात म्हणाले होते, “कलम 370 मुळे देश आणि काश्मीरचं काहीही चांगलं झालं नाही. हे कलम खूप अगोदरच हटवायला हवे होते. हे कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद संपेल आणि काश्मीर विकासाच्या दिशेने पुढे जाईल.
बबिता फोगाटने यापूर्वी तिला मिळालेल्या हरियाणा पोलीस विभागातील निरिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. महावीर फोगाट हे यापूर्वी जेजेपीमध्ये स्पोर्ट विंगचे काम पाहत होते.