Devendra Fadnavis : भाजपने अपक्षांशी संपर्क साधला का? देवेंद्र फडणवीस म्हणाले….

| Updated on: Nov 21, 2024 | 2:20 PM

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कोणाला होणार? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज या प्रश्नांची उत्तर दिली. मतदानाची वाढलेली टक्केवारी, अपक्षांशी संपर्क साधण्यात आलाय का? या सर्व प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिली.

Devendra Fadnavis : भाजपने अपक्षांशी संपर्क साधला का? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
devendra fadnavis
Follow us on

“महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आजपर्यंत जेव्हा, जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे, तेव्हा-तेव्हा भाजपा आणि मित्र पक्षांना फायदा झालेला आहे. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीवाचा आम्हाला फायदा होईल. महाराष्ट्रात आम्ही सत्तेवर येऊ अशी अपेक्षा आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महिलांचं मतदान वाढलं आहे का? “महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आम्ही बूथ सर्टिफिकेट गोळा केलेत. मी 20 ते 25 मतदारसंघात फोनवर बोललो आहे. त्यांचं म्हणण आहे की, महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संभाव्य अपक्ष उमेदवारांना संपर्क केला जात आहे का? भाजपकडून अपक्षांशी संपर्क साधण्यात येतोय का? या प्रश्नावर आम्ही कोणाशी संपर्क साधलेला नाही असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. भाजप अदानीला वाचवत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘राहुल गांधी रोज बोलत असतात’

‘वाढलेल्या टक्केवारीमध्ये प्रो-इनक्बसी फॅक्टर’

एक्झिट पोलवर प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘एक्झिट पोलवर प्रवक्ते बोलतात, नेते नाही’ मतदानाची टक्केवारी लाडकी बहीण सारख्या महिलांच्या योजनेमुळे वाढली आहे का? लाडकी बहिण योजनेमुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्रीपदाबाबत कुठली चर्चा सुरु आहे? त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कुठलीही चर्चा सुरु नाहीय. रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि ठरवू” मतदानाची टक्केवारी वाढण्यामागे नेमके काय कारण आहेत? “मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीमध्ये प्रो-इनक्बसी फॅक्टर दिसून येतोय. लोकांना सरकारबद्दल आपुलकी वाटते” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तरी सरकार आमचच येणार – राहुल नार्वेकर

“मतदान पार पडलं आहे. आता निवांत झालोय. मला कुठलाही तणाव वाटत नाही. कुलाब्यात विजय नक्की होईल. कुलाब्यात एकूण मतदान कमी झालं आहे. पण राज्यात पुन्हा महायुतीच सरकार येईल. 175 जागा महायुतीच्या येतील. अपक्ष किंगमेकर ठरले तर ते आमचेच असतील. संजय राऊत काहीही दावा करत असतील, तरी सरकार आमचच येणार” असं राहुल नार्वेकर म्हणाले.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

“महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं पाहायला मिळालं, दोन मोठे पक्ष आहेत त्यात फूट पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेने सोबत भिडले. शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीशी भिडले. या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी आर्थिक व्यवहार केला, त्यांना प्रतिसाद मिळाल्याचे दिसते. आर्थिक व्यवहाराचा निकाल या निवडणुकीवर दिसेल. महायुती आणि महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करू शकतात. सरकार कुणाचंही आलं तर ते स्थिर राहील याची खात्री देता येत नाही” असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.