मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्रीत भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची (Devendra Fadnavis took oath as Maharashtra Chief Minister) तर अजित पवार (NCP’s Ajit Pawar took oath as Deputy CM) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. संपूर्ण महाराष्ट्रात साखरझोपेत असताना रातोरात राष्ट्रपती राजवट हटवली गेली. इतकंच काय तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधीही पार पडला. महाराष्ट्राला किंचितही कल्पना न येता भल्या पहाटे हा शपथविधी आटोपण्यात आला.
गेली महिनाभर राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत सत्तास्थापनेबाबत चर्चा आहे. इतकंच काय तर खुद्द शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांची काल रात्रीच बैठक झाली. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं. मात्र महाराष्ट्राला गोंधळात टाकणारी सकाळ उजाडली आणि राजकीय भूकंप पाहायला मिळाला.
भल्या पहाटे राष्ट्रपती राजवट हटली
राष्ट्रपती राजवट हटवण्याच्या घडामोडी रातोरात घडल्या. राज्यपालांना फडणवीस सत्ता स्थापन करु शकतात असा विश्वास बसला. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवण्याची मागणी केली. रात्रीत चक्रं फिरली आणि भल्या पहाटे म्हणजे 5 वाजून 47 मिनिटांनी महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली.
The notification revoking President’s rule in Maharashtra pic.twitter.com/JSbAIOFUE6
— ANI (@ANI) November 23, 2019
राजभवनात शपथविधी
दरम्यान, भाजप-राष्ट्रवादीचं सरकार येणार हे निश्चित झाल्यानंतर राजभवनात शपथविधी आयोजित करण्यात आला. सकाळी 8 वाजता राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
Devendra Fadnavis took oath as Maharashtra Chief Minister again,NCP’s Ajit Pawar took oath as Deputy CM,oath was administered by Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan pic.twitter.com/KrejSTXTBd
— ANI (@ANI) November 23, 2019
याबाबत अजित पवार म्हणाले, “मागील अनेक दिवसांपासून सरकार स्थापन होत नव्हते. तसेच अनेक मागण्याही वाढत होत्या. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. शरद पवारांना याविषयी आधी माहिती दिली होती, पण नंतर मी त्यांना सांगत होतो की कोणी तरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र येऊन आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतला.”
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सर्वात प्रथम आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता, तरिही आमचा मित्रपक्ष शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे अखेर आम्ही महाराष्ट्राला स्थीर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे दावा केला. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे याबाबत माहिती देऊन आज आम्हाला शपथविधीसाठी बोलावलं. आम्ही स्थीर सरकार देऊ. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहू.”
शरद पवार यांचं स्पष्टीकरण
BREAKING – अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक, राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही, शरद पवार यांचं स्पष्टीकरण https://t.co/pifKqSNQ2N pic.twitter.com/KzOJ0vAT6S
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019