कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक (Kolhapur Municipal corporation election 2021) पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता आहे. (Kolhapur Municipal corporation election 2021 postponed)
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मार्चमधील संभाव्य निवडणूक आता नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. प्रशासक म्हणून कादंबरी बलकवडे यांच्याकडेच पालिकेचा कार्यभार राहणार आहे. त्यामुळे इच्छुकांचा दुसऱ्यांदा हिरमोड झाला आहे.
उर्वरित चार महापालिकांचं काय होणार?
कोल्हापूर महापालिकेसोबतच औरंगाबाद महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका, नवी मुंबई महापालिका आणि वसई-विरार महापालिका या पाच महापालिकांचा कार्यकाळही संपला आहे. त्यामुळे या महानगर पालिकांच्या निवडणुकांबाबत काय निर्णय होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
कोल्हापूर महापालिकेमध्ये सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. आघाडीला शिवसेनेचीही साथ आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत यंदा तिन्ही पक्ष एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
मागील निवडणुकीत काय घडलं?
गेल्यावेळी भाजपने स्थानिक ताराराणी आघाडीशी युती करून सत्तेच्या जवळपास यश मिळवलं. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेच्या चार सदस्यांना आपल्या सोबत घेतल्याने भाजपच्या तोंडचा घास हिरावला गेला.
गेल्यावेळी भाजप सत्तेत होता त्याचा परिणाम महानगरपालिका निवडणुकीतील यशावर झाला. आता सत्ता नसताना ही तीच किमया साधावी लागणार आहे. ताराराणी आघाडीचे प्रमुख असलेले महाडिक कुटुंबीय आता भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली जावी असाही एक मतप्रवाह आहे. मात्र बंडखोरीचा धोका असल्यानं सध्यातरी चंद्रकांतदादा ताराराणी आघाडी आणि भाजप अशी युती करण्याच्याच मानसिकतेत आहेत.
विधानसभेचा निकाल
कोल्हापूर जिल्ह्यात दोन खासदार आहेत. हे दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. मात्र 2019 च्या विधानसभा निकालात कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड उलटफेर पाहायला मिळाले. शिवसेनेने 6 पैकी 5 जागा गमावल्या. तर कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त झाला.
2014 मध्ये ज्या शिवसेना-भाजपने कोल्हापुरातल्या 10 जागांपैकी 8 जागा जिंकल्या होत्या (Kolhapur Vidhansabha Results). त्या युतीला यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूरमध्ये फक्त 1 जागा मिळवता आली. म्हणजे एकट्या कोल्हापुरात तब्बल 7 जागांवर युतीला फटका बसला. (Kolhapur Municipal corporation election postponed)
कोल्हापुरातील सध्याचं काय चित्र?
कोल्हापूर महापालिकेत सध्या महाविकास आघाडीचीच सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्याच्या काही वर्षे आधीपासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष महापालिकेत एकत्र आले होते.
तिन्ही पक्ष आता आगामी निवडणूक एकत्र लढतात की स्वतंत्र हे येत्या काळात स्पष्ट होईल. जागा वाटपातील अडथळे दूर करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा फॉर्म्युला वापरण्याची शक्यता असून निवडणुकीनंतर मात्र पुन्हा महाविकास आघाडी स्थापन होऊ शकते. विशेष म्हणजे, काही प्रभागात छुपी युती करत भाजप आणि ताराराणी आघाडीला आव्हान देण्याचीही शक्यता आहे
कोल्हापूर महापालिका निवडणूक पक्षीय बलाबल (Kolhapur Municipal corporation election 2021)
संबंधित बातम्या :
कोल्हापूर मनपा निवडणूक : पक्षीय बलाबल, सध्या कुणाकडे किती जागा?
(Kolhapur Municipal corporation election 2021 postponed)