संजय राऊत यांना जामीन नाहीच; न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ
शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. संजय राऊत यांना आज देखील जामीन मिळू शकलेला नाही. संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
मुंबई : शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. संजय राऊत यांना आज देखील जामीन मिळू शकलेला नाही. संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संजय राऊतांना 4 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) आज संपत असल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. मात्र आज देखील त्यांच्या कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीकडून विरोध करण्यात आला आहे.
Published on: Sep 19, 2022 02:23 PM
Latest Videos