नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीन बिघडून जाईल… संजना घाडींनी खिल्लीच उडवली!

| Updated on: Dec 22, 2022 | 4:38 PM

ज्या शिवसैनिकानं तुझ्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलं.... त्यांना तू विसरलास... मुळात तुझा स्वभाव गद्दारीचा, विश्वासघातकी... अशी टीका संजना घाडी यांनी खासदार राहुल शेवाळेंवर केली.

नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीन बिघडून जाईल... संजना घाडींनी खिल्लीच उडवली!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः नारायण राणेंची (Narayan Rane) नार्को टेस्ट (Narco Test) झाली तर ते मशीनच बिघडून जाईल. कधी काँग्रेस, कधी भाजपा तर कधी शिवसेनेला शिव्या घालतायत… अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संजना घाडी (Sanjana Ghadi) यांनी प्रतिक्रिया दिली. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी आज नितेश राणे यांनी केली. यावर प्रतिक्रिया देताना संजना घाडी यांनी राणे कुटुंबियांची खिल्ली उडवली. त्यांच्या घरात-सिंधुदुर्गात काय सुरु आहे, यावरून त्यांनी तीव्र शब्दात टीका केली.

माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजना घाडी म्हणाल्या, ‘ नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांची आधी नार्को टेस्ट झाली पाहिजे. यांच्या बायका का टिकत नव्हत्या? यांच्या घरातले टीव्ही का फुटत होते? सिंधुदुर्गातल्या घराघरात हे माहिती आहे. नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीन बिघडून जाईल. कधी काँग्रेस, कधी बीजेपीला कधी शिवसेनेला शिव्या घालतायत.. कुठला पक्ष ठेवलाय का तुम्ही? असा सवाल संजना घाडींनी केला.

आदित्य ठाकरेंविरोधात बोलणाऱ्या बंडखोरांविरोधात शिवसेनेची महिला आघाडी यावेळी एकवटलेली दिसली. आम्ही महिला मिळूनच यांना उत्तर देऊ, अशी भूमिका संजना घाडी यांनी मांडली.

शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे संबंध आहेत का, यासाठी सखोल चौकशीची मागणी काल केली. त्यानंतर आज विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी ही मागणी अधिकच उचलून धरली.

राहुल शेवाळेंवर टीका करताना संजना घाडी म्हणाल्या, राहुळ शेवाळेंनी स्वतःच्या धर्मपत्नीबरोबरही वचनं निभावू शकले नाहीत. अशी भळभळती जखम घेऊन ती महिला तुझ्याबरोबर राहतेय…

ज्या मतदारांनी शिवसेनेचा खासदार म्हणून तुला निवडून दिलं, त्या शिवसैनिकानं आपल्या रक्ताचं पाणी केलं…. त्यांना तू विसरलास… मुळात तुझा स्वभाव गद्दारीचा, विश्वासघातकी… अशी टीका घाडी यांनी केली. अशा या लोकप्रतिनिधीवर लोकांनीही विश्वास ठेवू नये.. अशा या खासदारावर महिलांनी लांब रहावं, अशी प्रतिक्रिया संजना घाडी यांनी दिली.