युतीवर भाष्य, मंत्रिपदाची आकांक्षा, शहाजीबापू पाटील यांची सर्वव्यापी प्रतिक्रिया

| Updated on: Oct 22, 2022 | 12:57 PM

Shahaji Bapu Patil : आमदार शहाजीबापू पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पाहा...

युतीवर भाष्य, मंत्रिपदाची आकांक्षा, शहाजीबापू पाटील यांची सर्वव्यापी प्रतिक्रिया
Follow us on

सांगोला : शिंदेगटाचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मनसे, भाजप आणि शिंदे गटाच्या युतीवर (MNS BJP Shinde Group Alliance) भाष्य केलं आहे. मनसेसोबत युती करायला कोणतीच अडचण नाही, असं शहाजीबापू म्हणालेत.

माझ्या माहितीनुसार मनसे बरोबर युती होण्याला कोणतीही अडचण नाही. तिन्ही पक्षाचा अजेंडा आणि बेस हिंदुत्वाचा आहे. त्यामुळे एका आधारावर या तिन्ही नेत्यांना एकत्र येण्यासाठी राजकारणात मला कोणतीही अडचण वाटत नाही, असं शहाजीबापू म्हणालेत.

मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कवरच्या मनसेच्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तेव्हा राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीस एकाच मंचावर पाहायला मिळाले. तेव्हापासून युतीच्या चर्चा होत आहेत. त्यातच आता शहाजीबापूंनी हे विधान केलं आहे.

मंत्रिपदावर काय म्हणाले?

मंत्रिमंडळ विस्तार काहीच दिवसात होऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यावर विचारलं असता, बरेच राजकीय विश्लेषक, जाणकार मंडळी येऊन भेटतात. त्यांचं असं म्हणणं आहे की, 1995 साली आमदार असलेले काही मोजके नेते आहेत. त्यामुळे तुम्ही ज्येष्ठ राजकीय नेते आहात. तुम्ही महाराष्ट्र फिरला आहात.तुम्हाला अनुभव आहे. तुमच्यासारख्या अनुभवी नेत्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे, असं हे लोक मला सांगतात. प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातील जनतेला वाटतं. आपला आमदार मंत्री झाला पाहिजे, तसं माझ्या मतदार संघातील लोकांनाही वाटतं,असं शहाजी बापू म्हणालेत.

मंत्रिपदाबाबत निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझा निर्णय घेतील. फक्त घेतील. नामदार असो किंवा नसो. माझी सर्वात मोठी ओळख एकनाथ शिंदेंचा कडवा सैनिक ही आहे. मला राजकारण करण्यासाठी ही ओळख आणि व्याख्या पुरेशी आहे. त्यामुळे मी चिंता करत नाही, असंही ते म्हणालेत.

दिवाळीनिमित्त खास डायलॉग

“काय शिंदे-फडणवीस सरकार, काय सणासुदीचे दिवस अन् काय तो महाराष्ट्रात जिकडं तिकडं आनंदी आनंद!”, असं म्हणत शहाजी बापू पाटील यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.