संजय राऊत नारदमुनी, तुरुंगातूनही काडी पेटवतात; शहाजीबापूंची टोलेबाजी

| Updated on: Oct 18, 2022 | 12:49 PM

बाळासाहेबांचे विचार घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप जात आहे. त्यामुळे आमच्या युतीला जनतेने कौल दिला आहे. आम्हीच खरी शिवसेना असल्याचं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे.

संजय राऊत नारदमुनी, तुरुंगातूनही काडी पेटवतात; शहाजीबापूंची टोलेबाजी
संजय राऊत नारदमुनी, तुरुंगातूनही काडी पेटवतात; शहाजीबापूंची टोलेबाजी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

रवी लव्हेकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सोलापूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या आवाहनानंतर भाजपचे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार मुरजी पटेल (murji patel) यांनी माघार घेतली. त्याचं सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केलेलं असताना ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मात्र, हे सर्व स्क्रिप्टेड असल्याचा दावा करून भाजपच्या निर्णयाची हवा काढली आहे. राऊत यांच्या या टीकेचा शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (shahaji bapu patil) यांनी समाचार घेतला आहे. संजय राऊत हे नारदमुनी आहेत. ते तुरुंगातूनही काडी पेटवतात, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.

शहाजीबापू पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला यातून राज्याची संस्कृती पुढे येताना दिसत आहे. राजसाहेबांच्या पत्राची दखल फडणवीस यांनी तात्काळ दखल घेऊन पुढील कार्यवाही केली, असं सांगतानाच संजय राऊत हे नारद मुनीचे पात्र आहे. तुरुंगातूनही काडी पेटवत आहेत, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

शिंदे साहेबांच्या नेतृत्वात यावं ही माझी इच्छा आहे. म्हणून अभिजीत पाटील यांच्याबाबत विधान केल. पण आपण निवडूनच येणार. माझी विधानसभा निवडणुकीत माघार नाही. सगळे विरोधक मिळून या.भुगा करुन तुम्हाला निवडणुकीत पाडून मी पुन्हा आमदार म्हणून मुंबईला जाईल, असा दावा त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांना काँग्रेसने भारत जोडो यात्रेला निमंत्रण दिलं आहे. पण उद्धव ठाकरे यांचं काँग्रेससोबत जाणं हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रतारणा करण्यासारखं आहे, अशी टीका त्यांनी केली.

यावेळी त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवरही भाष्य केलं. बाळासाहेबांचे विचार घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप जात आहे. त्यामुळे आमच्या युतीला जनतेने कौल दिला आहे. आम्हीच खरी शिवसेना असल्याचं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर काल सुनावणी होती. त्यासाठी त्यांना सत्र न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरे यांचं पत्रं हे स्क्रिप्टेड आहे.

भाजपने सर्व्हे केला होता. त्यात त्यांचा पराभव होणार असल्याचं समजलं होतं. त्यामुळे पुढील निवडणुकीवर या पराभवाचा परिणाम होऊ नये म्हणून भाजपने राज ठाकरे यांच्यासोबत मिळून हा बनाव केल्याचा दावा राऊत यांनी केला होता.