ठाणे : राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने पहिली मोठी घोषणा केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा राष्ट्रवादीने केली. राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली. भाजप आणि मनसेला शह देण्यासाठी आम्ही चांगली एकता तयार करु, अशी प्रतिक्रिया जगन्नाथ शिंदे यांनी दिली. (Maha Vikas Aaghadi Fight KDMC Election together)
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादीचे दोनच नगरसेवक होते. पक्षाला तारण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांना जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. आज जगन्नाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या घरी मोठ्या संख्येने जमा झाले.
यावेळी शिंदे म्हणाले, “सर्व पद्धतीने पक्षाची बांधणी करायची आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रखडलेल्या विकासकामांना चालना देण्याचा माझा पहिला प्रयत्न आहे. यामध्ये स्वच्छता, रस्ते, पाणी आरोग्य या महत्वाच्या बाबींवर मी जास्त लक्ष देणार आहे”.
राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. शिवसेना, काँग्रेस आाणि राष्टवरादीची आघाडी आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक सुद्धा महाविकास आघाडी लढविणार आहे. त्यात राष्ट्रवादीचे 14 नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. सगळ्यांना समान न्याय देताना पुन्हा एकदा महापौर आघाडीचा कसा येईल याकडे माझे लक्ष आहे, असं जगन्नाथ शिंदे यांनी सांगितलं.
निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेने दंड थोपटले आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडी सुद्धा त्यांना शह देण्यासाठी चांगली एकता तयार करेल. महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. (Maha Vikas Aaghadi Fight KDMC Election together)
GHMC Election : शेलार-फडणवीस जोडगोळी हैदराबाद मोहिमेवर, मनपा जिंकण्याची जय्यत तयारी#GHMCElection #devendrafadanvis #ashishshelarhttps://t.co/E5A0Zvjr9P
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 26, 2020
संबंधित बातम्या :
सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा मार्च 2021 नंतरच, सहकार मंत्र्यांची माहिती