स्त्रीशक्तींच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांचे मोहन भागवत यांना दोन सवाल; म्हणाले…
उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांना दोन सवाल विचारत थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या हिंदुत्वावर बोट ठेवत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना देखील टोला लगावला आहे.
मुंबई : मोहन भागवत (Mohan Bhagvat) मशिदीत गेले होते. कशासाठी गेले होते. त्यांनी हिंदुत्व (Hindutva) सोडलं का? भागवत तिकडे गेले. त्यांचा संवाद सुरू आहे. त्यांचं राष्ट्रीय कार्य आहे. आम्ही काँग्रेससोबत (Congress) गेलो तर हिंदुत्व सोडलं? कुठला संबंध कुठे लावता. मोहन भागवत यांनी महिला शक्तींबद्दल बोलले. मला तुम्हाला दोन प्रश्न करायचे आहे. अंकिता भंडारी या उत्तराखंडच्या मुलीची हत्या झाली. रिसॉर्टमध्ये मृतदेह आढळला. ते रिसॉर्ट भाजपच्या नेत्याचं आहे. ही स्त्रीशक्तीचा आदर आहे का? त्या अंकिताची आई टाहो फोडतेय. काय कारवाई केली? शिक्षा देणार आहात का? फासावर चढवणार आहात का ? अंकिता भंडारे ही महिला आहे. तुम्ही मशिदीत जाऊन आला. म्हणून बोलतो. नाही तर बोललो नसतो, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारला आहे.
तर दूसरा सवाल बिल्किस बानू या प्रकरणावरून विचारला आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले दुसरी बातमी वाचली. बिल्किस बानू. ती गर्भवती होती. तिच्यावर बलात्कार झाला. तिच्या नातेवाईकांना मारलं. आरोपी पकडले.
पण भाजप सरकारने त्यांना सोडलं. आरोपींचा सत्कार केला. तुमच्या पक्षात या गोष्टी घडत असेल. तुमच्या अनुयायांकडून या गोष्टी घडत असतील तर कुणाकडून अपेक्षा करायची?
असे सवाल उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांना विचारत ठाकरे यांनी थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या हिंदुत्वावर बोट ठेवत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना देखील टोला लगावला आहे.
शिवाजी पार्क येथे झालेल्या दसऱ्या मेळाव्यात बोलत असतांना उद्धव ठाकरेंनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना सवाल विचारले आहे.