ना गाडी, ना बंगला, नावावर फक्त 28 लाखांची संपत्ती; महाराष्ट्राला मिळाला 25 वर्षांचा तरुण आमदार, पवारांचा लाडका 27 हजारांनी विजयी
महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल समोर आले. निकालाचा कल हा महायुतीच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळाला.पण यात अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे की महाराष्ट्राला 25 वर्षांचा तरुण अन् तडफदार आमदार मिळाला आहे. शिवाय हा आमदार जनतेप्रमाणे शरद पवारांचाही लाडका आहे.
23 नोव्हेंबर 2024 म्हणजे आज महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल समोर आले. निकालाचा कल हा महायुतीच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळाला. आजच्या निकालात विजयी आणि पराभूत झालेल्यांची नावे पाहून बऱ्यापैकी सर्वच पक्षांतील उमेदवारांच्या भुवया उंचावल्या होत्या.
आजच्या निकालात जे विजयी झाले ते राजकारणातले अनुभवी व्यक्तीमत्व आहेत. पण आजच्या निकालात अजून एकाच्या विजयाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या तो म्हणजे तासगाव- कवठेमहांकाळ विधासभा मतदारसंघातून निवडून आलेला उमेदवार.
या मतदारसंघातला विजयी उमेदवार हा सर्वात कमी वयाचा आमदार ठरला आहे. हा आमदार अवघ्या 25 वर्षांचा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदारांपैकी एक आमदार यंदाच्या विधानसभेमध्ये निवडून आला आहे.
या आमदाराचं नाव आहे, रोहित आर पाटील. विशेष म्हणजे अवघ्या 10 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा हा आमदार आहे. तसेच सर्वांनाच माहित आहे की रोहित पाटील हे माजी गृहमंत्री दिवंगत आरआर पाटील यांचे सुपुत्र आहेत. रोहित पाटलांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. दरम्यान पहिल्या प्रयत्नात रोहित यांना हे य़श मिळालं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर रोहित पाटील आणि त्यांच्या आई सुमनताई पाटील यांच्यासहीत संपूर्ण कुटुंबाने शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. रोहित पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेसकडून तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते आणि त्यांना तिथे मोठे आव्हान होते ते म्हणजे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे.
संजयकाका पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र रोहित पवारांनी संजयकाका यांचा तब्बल 27 हजार 644 मतांनी पराभव केला.
तासगाव मतदारसंघात 1990 पासून पाटील यांच्या कुटुंबाचे वर्चस्व आहे. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुमनताई पाटील 2014 च्या पोटनिवडणुकीत आणि 2019 च्या निवडणुकीत जिंकल्या होत्या.
सुमनताई पाटील यांच्यानंतर रोहित पाटील हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. जनतेच्या प्रेमाने त्यांना 27 हजार मतांनी जिंकून दिलं आहे. रोहित 15 व्या विधानसभेच्या सभागृहातील सर्वात तरुण आमदार ठरले आहेत.
दरम्यान रोहित पाटील यांच्या साधेपणाचीही तितकीच चर्चा होताना दिसते. ते शरद पवार यांच्या फार जवळचे आणि लाडके आहेत. तसेच रोहित यांच्या प्रतिज्ञापत्रात केलेल्या संपत्तीचीही तेवढीच चर्चा होते.कारण प्रतिज्ञापत्रात उल्लेख केल्याप्रमाणे, त्यांच्या नावे फक्त 36 हजारांची रोख रक्कम आहे. तसेच एक लाख 60 हजार रुपयांचे दागिने आहेत. त्यांच्या नावावर ना कोणता बंगला नाही गाडी आहे. म्हणजे रोहित पाटील यांच्याकडे एकून 28 लाख 42 हजार रुपये मालमत्ता आणि 86 लाख 80 हजार रुपयांची अचल मालमत्ता आहे.