Kalsarpa Yoga : पत्रिकेत कधी तयार होतो कालसर्प योग? हे आहेत लक्षण आणि उपाय

| Updated on: Jun 16, 2023 | 12:55 PM

असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत काल सर्प दोष असतो, त्या व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पत्रिकेत काल सर्प दोषामुळे व्यक्तीवर मानसिक आणि शारीरिक प्रभाव पडतो.

Kalsarpa Yoga : पत्रिकेत कधी तयार होतो कालसर्प योग? हे आहेत लक्षण आणि उपाय
कालसर्प दोष
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : कालसर्प योग (Kalsarpa Yoga) हा कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीत असू शकतो मग ती व्यक्ती श्रीमंत असो, गरिबीत असो, राजकारणी, नोकरदार किंवा व्यावसायिक असो या भौतिक हुद्यांनी काही फरक त्यात होत नाही. अशा व्यक्तीला सर्व सुख सुविधा उपलब्ध असल्या तरीही अनेक संकटांना, कष्टाला सामोरे जावे लागते. अशा व्यक्तीला गुप्त शत्रूंचा त्रास, अकस्मात अपघातांना तोंड द्यावे लागते. ज्योतिष शास्त्रात काल सर्प दोष किंवा काल सर्प योग अत्यंत अशुभ मानला जातो. असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत काल सर्प दोष असतो, त्या व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पत्रिकेत काल सर्प दोषामुळे व्यक्तीवर मानसिक आणि शारीरिक प्रभाव पडतो. म्हणूनच कालसर्प दोषाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे. कालसर्प दोष म्हणजे काय, पूजन पद्धत आणि कालसर्प दोषाची लक्षणे जाणून घेऊया.

कालसर्प दोषाची लक्षणे

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष असतो त्याला स्वप्नात अनेकदा मृत व्यक्ती दिसतात. इतकंच नाही तर कुणीतरी त्यांचा गळा दाबत असल्याचंही काही जणांना दिसतं. ज्या व्यक्तीच्या जीवनात काल सर्प दोष असतो त्याला जीवनात खूप संघर्ष करावा लागतो आणि गरज असताना एकटेपणा जाणवतो. कालसर्प योग असलेल्या व्यक्तीच्या व्यवसायावर खूप नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे व्यवसायात वारंवार तोटा सहन करावा लागतो. जोडीदारासोबत मतभेद होतात. जर तुम्ही रात्री वारंवार उठत असाल तर हे देखील काल सर्प दोषाचे लक्षण आहे.  काल सर्प दोषामुळे व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. यासोबतच डोकेदुखी, चर्मरोग इत्यादीही कालसर्प दोषाची लक्षणे आहेत.

कुंडलीत काल सर्प योग कधी तयार होतो?

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीत सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा काल सर्प दोष नावाचा योग तयार होतो.

हे सुद्धा वाचा

काल सर्प दोषाचे उपाय

कालसर्प दोषामुळे माणसाला जीवनात खूप संघर्ष करावा लागतो, अशा परिस्थितीत लवकरात लवकर सुटका होणे अत्यंत आवश्यक आहे. काल सर्प दोषाचे उपाय जाणून घेऊया. काल सर्प दोषाचा प्रभाव कमी करण्याचे काही सोपे मार्ग जाणून घेऊया.

1) काल सर्प दोष असलेल्या व्यक्तीने दररोज घरी किंवा मंदिरात जाऊन शिवलिंगावर अभिषेक करावा.

2) प्रदोष तिथीच्या दिवशी शिवमंदिरात रुद्राभिषेक करणेही लाभदायक असते.

3) याशिवाय त्या व्यक्तीने दररोज कुलदैवताची पूजा करावी.

4) महामृत्युंजय मंत्राचा जप रोज किमान 108 वेळा करावा.

5) याशिवाय दररोज 11 वेळा हनुमान चालिसाचे पठण करावे.

6) कालसर्प पीडित व्यक्तीने आपल्या घरात मोराची पिसे ठेवावीत.

काल सर्प दोष पूजेचे फायदे

1) जर एखाद्या व्यक्तीने कालसर्प दोष निवारण्यासाठी पूजा केली तर त्या व्यक्तीला जीवनात खूप आराम मिळतो.
काल सर्प दोष पूजेनंतर व्यक्तीचे वैवाहिक जीवन खूप चांगले बनते. पती-पत्नीमध्ये आनंदाचे वातावरण असते.
2) त्याचबरोबर तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढते.

3) एवढेच नाही तर तुमच्या कुटुंबातही शांततेचे वातावरण राहते.
4) व्यवसायात येणाऱ्या अडचणी संपतात. आणि व्यवसाय वाढू लागतो.
5) नोकरदारांना पद प्रतिष्ठा मिळते आणि त्यांच्या पदावर प्रगती होते.
6) आर्थिक समस्यांपासूनही सुटका मिळेल.

कालसर्प दोष पूजा पद्धत

1) कालसर्पापासून मुक्ती मिळवण्यासाठी पूजेच्या दिवशी व्रत ठेवावे. त्याचबरोबर ब्रह्मचर्य पाळावे.
2) यानंतर शिवलिंगाचा रुद्राभिषेक करावा.
3) महामृत्युंजय मंत्राचा जप करा.
4) नाग देवतेची पूजा करून नागाच्या मूर्तीला दूध अर्पण करावे.
5) नाग गायत्री मंत्राचा जप करा – “ओम नागकुलाय विद्महे विषदन्तया धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात”।
6) तुम्ही “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप देखील करू शकता.
7) नागपंचमीच्या दिवशी भगवान शिव आणि विष्णूची पूजा केल्याने काल सर्प योगाचा प्रभाव कमी होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)