दर्श अमावस्येला करा हे पाच उपाय, पितरांना मिळेल शांती

दर्श अमावस्या ही पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा, दान आणि उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते. दर्श अमावस्येच्या दिवशी हे उपाय केल्याने पितरांची शांती होते.

दर्श अमावस्येला करा हे पाच उपाय, पितरांना मिळेल शांती
दर्श अमावस्या
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 12:56 PM

हिंदू धर्मात दर्श अमावस्येला खूप महत्त्व आहे. दर्श अमावस्या ही पूर्वजांना समर्पित मानली जाते. या दिवशी पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दान केले जाते. असे मानले जाते की या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात. या दिवशी पितरांची पूजा करणे, तर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही उपाय केल्याने घरात सुख, शांती कायम राहते. पितृदोष असल्यास या दिवशी विशेष पूजा केल्याने दोष दूर होतात. तसेच या दिवशी केलेल्या पूजेने पुण्य प्राप्त होते.

पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील दर्श अमावस्या 30 नोव्हेंबरला सकाळी 10: 29 मिनिटांनी सुरू होईल आणि एक डिसेंबरला सकाळी 11:50 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार दर्श अमावस्या 30 नोव्हेंबर रोजी असणार आहे.

दर्श अमावस्येला करा हे उपाय

पितृ दोष दूर करण्यासाठी

पिंपळाच्या झाडाला पूर्वजांचे निवासस्थान मानले जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून पाणी अर्पण करा आणि आणि दिवा लावा. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी यंत्रांची स्थापना करून पूजा करा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावून पितरांना अर्पण करा. या दिवशी मंत्र जप केल्याने पितरांची शांती होते.

दान

काळया तिळाचे दान केल्याने पितरांना शांती मिळते आणि गरिबांना अन्नदान केल्याने पितरांना समाधान मिळते. यासोबतच गरजूंना वस्त्रदान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि गाईंना चारा दिल्याने पितर प्रसन्न होतात.

श्राद्ध विधी

पितरांच्या नावाने पिंडदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. दर्श अमावस्येच्या दिवशी श्राद्धविधी केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद प्राप्त होतो.

पूर्वजांचे स्मरण करा

दर्श अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना वंदन करा. दान करताना आपल्या पूर्वजांची नावे घ्या.

मंदिरात पूजा करा

दर्श अमावस्येनिमित्त शिव मंदिरात जाऊन भगवान शंकराची पूजा करावी आणि पितरांच्या आशीर्वादासाठी शंकरांना प्रार्थना करावी. दर्श अमावस्येच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमच्या पितरांना शांती मिळेल आणि तुमचे जीवन सुखी होईल.

दर्श अमावस्येचे महत्त्व

दर्श अमावस्या हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे जो पितृपक्षाशी देखील संबंधित आहे. हा दिवस आपल्या पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात. या दिवशी पितरांची पूजा करणे, तर्पण अर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे पितरांच्या आत्मांना शांती मिळते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर या दिवशी विशेष पूजा केल्याने तो दोष दूर होतो. पितरांना प्रसन्न केल्याने घरात सुख शांती कायम राहते. या दिवशी केलेले दान आणि पूजा केल्याने पुण्य मिळते आणि व्यक्तीच्या जीवनात आर्थिक प्रगती होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'या' 24 उमेदवारांचा EVM पडताळणीसाठी अर्ज; उमेदवारांचा EVMवर संशय अन्..
'या' 24 उमेदवारांचा EVM पडताळणीसाठी अर्ज; उमेदवारांचा EVMवर संशय अन्...
'संजय राऊत मेंटल, पागल... त्याच्या हातात दगडं द्या अन् फिर म्हणा...'
'संजय राऊत मेंटल, पागल... त्याच्या हातात दगडं द्या अन् फिर म्हणा...'.
...म्हणून महायुतीचा विजय, आय एम अल्सो इंजिनिअर; जानकरांचं मोठं वक्तव्य
...म्हणून महायुतीचा विजय, आय एम अल्सो इंजिनिअर; जानकरांचं मोठं वक्तव्य.
'काळजीवाहू मुख्यमंत्री खचले, चेहऱ्यावर हास्य नाही, त्यांचा चेहरा...'
'काळजीवाहू मुख्यमंत्री खचले, चेहऱ्यावर हास्य नाही, त्यांचा चेहरा...'.
मुख्यमंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले,
मुख्यमंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले,.
'जे चाललंय ते...', महायुतीच्या रखडलेल्या शपथविधीवरून पवारांचा हल्लाबोल
'जे चाललंय ते...', महायुतीच्या रखडलेल्या शपथविधीवरून पवारांचा हल्लाबोल.
मुंबईकरांचा प्रवास लवकरच आरामदायी होणार, काय आहे मोठी बातमी?
मुंबईकरांचा प्रवास लवकरच आरामदायी होणार, काय आहे मोठी बातमी?.
उद्या लोकलने प्रवास करणार आहात? मग हा व्हिडीओ बघा, कसा असणार मेगाब्लॉक
उद्या लोकलने प्रवास करणार आहात? मग हा व्हिडीओ बघा, कसा असणार मेगाब्लॉक.
डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली तरूणी अन्... काय घडलं? बीडमध्ये बंदची हाक
डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली तरूणी अन्... काय घडलं? बीडमध्ये बंदची हाक.
मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 5 डिसेंबरला? दिल्लीत ठरलं कोणाला कोणती खाती?
मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 5 डिसेंबरला? दिल्लीत ठरलं कोणाला कोणती खाती?.