Numerology Today 12 December 2021 | तुमचा शुभ अंक ‘हा’ असेल तर, देवी लक्ष्मीचा कृपा सदैव तुमच्यावर राहील
आपल्या आयुष्यात अंक महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची महत्त्वाची शाखा मानली जाते. आपल्या जन्मकुंडलीमध्ये उपस्थित असलेली आपली राशिचक्र, ग्रह आणि नक्षत्र आपल्या जीवनावर प्रभाव टाकतात, त्याचप्रमाणे आपल्या जन्मतारखेचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो असे मानले जाते.
मुंबई : आपल्या आयुष्यात अंक महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची महत्त्वाची शाखा मानली जाते. आपल्या जन्मकुंडलीमध्ये उपस्थित असलेली आपली राशिचक्र, ग्रह आणि नक्षत्र आपल्या जीवनावर प्रभाव टाकतात, त्याचप्रमाणे आपल्या जन्मतारखेचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो असे मानले जाते. तुमच्या जन्मतारखेच्या आधारे तुम्हाला तुमचा शुभ अंक काढता येतो.
अंकशास्त्रात 1 ते 9 पर्यंत संख्या दिली जाते. राशीप्रमाणेच सर्व अंकाचा संबंधही कोणत्याही एका नवग्रहाशी संबंधित मानला जातो. अशा स्थितीत, शुभ अंकाशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या जीवनावर त्या ग्रहाचा प्रभाव नक्कीच असतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या राशीचे लोक आयुष्यात भरपूर पैसे कमावतात.
या तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान असतात अंकशास्त्रात 9 हा अंक खूप प्रभावशाली, मजबूत आणि भाग्यवान क्रमांक मानला जातो. जर तुमचा जन्म महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला झाला असेल तर 9 हा तुमचा शुभ अंक मानला जातो. उदाहरणार्थ, जर तुमचा जन्म 27 तारखेला झाला असेल, तर 2+7=9 बाहेर येईल.
त्यांच्या आयुष्यात पैशाची कमतरता भासत नाही अंकशास्त्रानुसार, मूलांक क्रमांक 9 असलेले लोक खूप हुशार असतात आणि त्यांची शक्ती मजबूत असते. त्यांना आयुष्यात जे काही मिळवायचे आहे, ते मिळवूनच राहतात. या राशीच्या व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि प्रबळ शक्तीमुळेच यांना जीवनात खूप प्रगती मिळते. ते कुठेही जातात तेथे उच्च पदांवर पोहोचतात. त्यांना प्रशासनातही मोठे पद मिळते. या लोकांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
या अंकाच्या लोकांचा स्वभाव 9व्या क्रमांकाच्या लोकांना भरभरुन आयुष्य जगायला आवडते. ते कुटुंब आणि मित्रांवर भरपूर पैसे खर्च करतात. त्यांचे राहणीमान, खाणेपिणे सर्व काही उत्तम दर्जाचे असते. हे लोक स्वभावाने खूप धाडसी आणि रागीट असतात. हे लोक स्वतःच्या अटींवर आयुष्य जगतात. मात्र, यांना वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येतात.
संबंधित बातम्या
Zodiac | ‘कठोर परिश्रम’ हीच या राशींच्या व्यक्तींची ओळख, तुमची रास यामध्ये आहे का ?
12 December 2021 Panchang : कसा असेल रविवारचा दिवस, पाहा काय सांगतेय पंचांग