Benefits of Chanting Bhojan Mantras : अनेक लोक जेवणापूर्वी मंत्राचा जप करतात, जेवणापूर्वी देवाचे आभार मानतात, असं का केलं जातं? हे तुम्हाला माहिती आहे का? यामुळे जीवनात अनेक प्रकारचे सकारात्मक बदल घडून येतात आणि हा आहार तुमच्यासाठी अधिक फलदायी ठरू शकतो, असं म्हणतात.
हिंदू धर्मग्रंथांमध्ये अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. अन्नाबाबतही असेच काही नियम आहेत, ज्याचे पालन केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. यामध्ये जेवणापूर्वी हात धुणे, जमिनीवर बसून मंत्रोच्चार करणे यांचा समावेश आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये त्यांचे लक्षणीय महत्त्व सांगण्यात आले आहे.
कोणता मंत्र म्हणावा?
जेवण्यापूर्वी देवाला नेवैद्य दाखवतात आणि ‘ॐ सह नाववतु ‘ या मंत्राचा जप करताना तुम्ही अनेकांना पाहिले असेल. ”ॐ सह नाववतु. सह नौ भुनक्तु. सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु. मा विद्विषावहै ॥ ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:” भोपाळचे निवासी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया मंत्रजप किती महत्वाचा आहे.
अशी मान्यता आहे की जेव्हा आपण जेवणापूर्वी मंत्राचा जप करतो तेव्हा ते आपल्याला अनेक प्रकारच्या पापांपासून वाचवते. कारण, या काळात आपण देवाला धन्यवाद देत असतो, ज्याने आपल्याला अन्न पुरवले आहे. तसेच नकळत झालेल्या चुकांची माफीही या मंत्रातून मागितली जाते. अशावेळी स्वयंपाक करताना आणि खाताना जर तुम्ही नको असलेली चूक केली असेल तर त्यातूनही सुटका होते.
काय फायदा होतो?
आपल्या जीवनात कर्मकांडांचा मोठा वाटा आहे आणि जर आपण जेवणापूर्वी मंत्राचा जप केला, म्हणजे देवाचे आभार मानले तसेच क्षमा मागितली, तर ते आपले संस्कार वाढवते. यामुळे तुमच्यात चांगले संस्कार निर्माण होतात आणि हा आहार तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे जेवणापूर्वी मंत्रजप करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते.
नकारात्मक ऊर्जेपासून बचाव
जेवताना अनेक नकारात्मक शक्तीही उत्तेजित होतात, ज्या आपल्या आजूबाजूला असतात. अशावेळी जेवण्यापूर्वी मंत्राचा जप केल्यास नकारात्मक ऊर्जेपासूनही तुमचा बचाव होतो. तसेच आपल्या शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे जेवणापूर्वी मंत्राचा जप अवश्य करावा.
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)