आपल्या आयुष्यात अनेकदा छोट्या-मोठ्या घटना घडतात, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र याच घटना आपल्या काही विशिष्ट प्रकारचे संकेत देखील देत असतात. ज्यातून तुम्हाला भविष्यात तुमच्यासोबत होणाऱ्या काही गोष्टींची जाणीव देखील होते. तुमच्या जेवणाच्या ताटात केस निघणं ही तशी एक छोटीशी घटना आहे. मात्र शास्त्रामध्ये त्याचा देखील अर्थ सांगितला आहे. काही लोक जेवणाच्या ताटात जर केस निघाला तर तो बाजूला काढून जेवण करतात. मात्र काही जण जेवणाच्या ताटात जर केस निघाला तर ते अन्न ग्रहण करत नाहीत.कारण ते या घटनेला अशुभ मानतात. जेवणाच्या ताटात केसं निघनं हे खरच अशुभ असतं का? जाणून घेऊयात शास्त्र काय सांगतं?
जेवणाच्या ताटात केस निघणं कोणत्या गोष्टींचे संकेत?
जेवण करताना ताटात केस सापडनं ही तशी सर्वसामान्य गोष्ट आहे. कारण अनेकदा केस धुताना, विंचरताना तुमचे केसं घरात इकडे-तिकडे उडतात. त्यामुळे काही वेळेला तुमच्या जेवणाच्या ताटात देखील केस आढळून येतो.मात्र ही जर घटना तुमच्यासोबत एक किंवा दोनदा घडली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. मात्र जर अशी घटना तुमच्यासोबत वारंवार घडत असेल तर शास्त्रानुसार असं अन्न ग्रहण करू नका, ज्यामध्ये केस आढळला असं अन्न ग्रहण करणं शास्त्रामध्ये अशुभ मानलं गेलं आहे.
पितृ दोषाचा संकेत
जर तुमच्या जेवणामध्ये वारंवार केस आढळून येत असेल तर हा पितृ दोषाचा संकेत मानला जातो. जर तुमच्यासोबत अशी घटना पितृ पक्षात झाली तर याचा अर्थ असा होतो की तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत, अशा स्थितीमध्ये तुम्ही एखाद्या ज्योतिषाचा किंवा पंडितांचा सल्ला घेऊ शकता. पितृ दोष दूर करण्यासाठी उपाय करू शकता.
आरोग्यावर परिणाम
जेवणाच्या ताटात केस निघाला असेल तर असं अन्न खाणं अध्यात्माच्याच नाही तर तुमच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातून देखील घातक ठरू शकतं. कारण अशा केसांवर विविध प्रकारचे बॅक्टेरिया असतात. जे जेवणाच्या माध्यमातून तुमच्या पोटात जातात. त्यामुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यामध्ये केस आढळला असं अन्न न खाण्याचा सल्ला दिला जातो.