SA vs AFG | अफगाणिस्तानने टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिका टीममध्ये 2 बदल
South Africa vs Afghanistan Toss | दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यनात नाणेफेकीचा कौल हा अफगाणिस्तानच्या बाजूने गेला आहे. जाणून घ्या दोन्ही टीमच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण कोण आहे ते.
अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 42 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. सामन्याचं आयोजन हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. अफगाणिस्तानने टॉस जिंकला. कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांचा वर्ल्ड कपमधील साखळी फेरीतील हा नववा आणि अखेरचा सामना आहे. दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलं आहे. तर अफगाणिस्तानने सेमी फायनलमधील आव्हान कायम राखलंय. मात्र न्यूझीलंडने श्रीलंका विरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे अफगाणिस्तानचं सेमी फायनलमधील आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. त्यामुळे अफगाणिस्तान सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दक्षिण आफ्रिका सेमी फायनल सामन्याच्या हिशोबाने तयारी करणार आहे.
अफगाणिस्तानला सेमी फायनलची संधी, पण.
अफगाणिस्तानने वर्ल्ड कपमध्ये 4 सामने जिंकून इतर संघांना चांगलीच टक्कर दिलीय. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ग्लेन मॅक्सवेल याच्या द्विशतकी खेळीमुळे जिंकलेला सामना गमावला. तर गुरुवारी न्यूझीलंडने श्रीलंकेवर विजय मिळवला. त्यामुळे न्यूझीलंडने 99 टक्के सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलंय. मात्र सेमी फायनलसाठी अफगाणिस्तानला संधी आहे, मात्र असून नसल्यासारखी. कारम अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत पोहचायचं असेल, तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध 440 धावांच्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.
दरम्यान अफगाणिस्तानने या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. अफगाणिस्तानने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. मात्र दक्षिण आफ्रिकाने 2 बदल केले आहेत. अँडिले फेहलुकवायो आणि गेराल्ड कोएत्झी या दोघांचं प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
अफगाणिस्तानने टॉस जिंकला
🚨 NEWS FROM AHMEDABAD 🚨
Afghanistan skipper @Hashmat_50 has won the toss and decided that AfghanAtalan will bat first against South Africa. 👍#AfghanAtalan | #CWC23 | #AFGvSA | #WarzaMaidanGata pic.twitter.com/Oo8vuEmLK9
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 10, 2023
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अँडिले फेहलुकवायो, डेव्हिड मिलर, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानुउल्लाह गुरबाज, इब्राहिम जद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नवीन-उल-हक.