AUS vs ENG : चौथ्या वनडे सामन्यात कौल लागला ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, कर्णधाराने घेतला असा निर्णय

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे चौथा सामना निर्णायक ठरणार आहे. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाचा बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी घेतली आहे.

AUS vs ENG : चौथ्या वनडे सामन्यात कौल लागला ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, कर्णधाराने घेतला असा निर्णय
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 27, 2024 | 6:45 PM

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा वनडे सामना सुरु झाला आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकताच ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्यापूर्वी पाऊस पडल्याने हा सामना सुरु होण्यास उशीर झाला. त्यामुळे या सामन्यातील षटकं कमी करण्यात आली आहेत. हा सामना फक्त 43 षटकांचा होणार आहे. या मालिकेतील तीन सामने झाले असून दोन ऑस्ट्रेलियाने, तर एका सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. पहिला कसोटी समाना ऑस्ट्रेलियाने 7 विकेटने जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 68 धावांनी इंग्लंडला धूळ चारली. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने 304 धावांचं आव्हान दिलं होतं. पण इंग्लंडने 37.4 षटकात 4 गडी गमवून 254 धावांपर्यंत मजल मारली आणि पाऊस आला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडने 46 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे चौथ्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर मालिका खिशात घालेल. दुसरीकडे, इंग्लंडने विजय मिळवला तर मालिकेची रंगत वाढेल.

ऑस्ट्रेलियाची कर्णधार मिचेल मार्शने सांगितलं की, ‘नाणं बदललं म्हणजेच नशीब बदलण्यासारखं आहे. आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. आम्ही खूप चांगले होतो. पण ब्रूक आणि जॅक्स या दोघांच्या चांगल्या खेळीमुळे सर्व गणित फिस्कटलं. सामन्यात इंग्लिस परत आला. कॅरी अजूनही फलंदाज म्हणून आहे, तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. झाम्पा आणि हेड देखील परत आले आहेत.

इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने सांगितलं की, ‘मला वाटते की आम्ही शेवटच्या सामन्यात चांगली कामगिरी केली, आम्ही खूप चांगले खेळलो. आम्ही काही षटके ओळखली जिथे आम्ही दबाव आणू शकलो आणि संधी साधली. आर्चर हा एक अप्रतिम परफॉर्मर आहे, आशा आहे की तो त्याच पद्धतीने पुढे करेल. आम्ही त्याच संघासोबत खेळत आहोत.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ॲलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, शॉन ॲबॉट, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, हॅरी ब्रूक (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद.

माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.
फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेला सलमानशी लग्न करायचंय?
फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेला सलमानशी लग्न करायचंय?.
सिनेट निकाल जाहीर, वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया,5 उमेदवार विजयी अन्...
सिनेट निकाल जाहीर, वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया,5 उमेदवार विजयी अन्....
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेन उघडल खातं
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेन उघडल खातं.
कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा
कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा.
लाडक्या बहिणीचा राग अनावर, कार्यालयाच्या तोडफोडीवर काय म्हणाले फडणवीस?
लाडक्या बहिणीचा राग अनावर, कार्यालयाच्या तोडफोडीवर काय म्हणाले फडणवीस?.
जसं काय राऊतांने सगळ्यांचे कपडे काढण्याचा अधिकार.., भाजप नेत्याची टीका
जसं काय राऊतांने सगळ्यांचे कपडे काढण्याचा अधिकार.., भाजप नेत्याची टीका.
अक्षयच्या दफनविधीला विरोध, मृतदेहाचं काय होणार? कोर्टाचे आदेश काय?
अक्षयच्या दफनविधीला विरोध, मृतदेहाचं काय होणार? कोर्टाचे आदेश काय?.
दिघेंचं नाव घेण्याची लायकी या विषारी सापात...भाजप नेत्याची टीका
दिघेंचं नाव घेण्याची लायकी या विषारी सापात...भाजप नेत्याची टीका.
फडणवीस धर्मवीर 3 ची पटकथा लिहीणार? राऊत म्हणताय, त्यांनी 'गोलमाल'....
फडणवीस धर्मवीर 3 ची पटकथा लिहीणार? राऊत म्हणताय, त्यांनी 'गोलमाल'.....