AUS vs IND : लवकर उठायची तयारी ठेवा, तिसऱ्या सामन्याला किती वाजता सुरु होणार?

| Updated on: Dec 13, 2024 | 5:27 PM

Australia vs India 3rd Test Live Streaming : क्रिकेट चाहत्यांना तिसऱ्या सामन्यासाठी झोपमोड करावी लागणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार पहाटे सुरुवात होणार आहे. जाणून घ्या.

AUS vs IND : लवकर उठायची तयारी ठेवा, तिसऱ्या सामन्याला किती वाजता सुरु होणार?
aus vs ind 3rd test live streaming
Follow us on

टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या इतिहासात यंदापासून पहिल्यांदाच 5 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. ही मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. टीम इंडियाने पर्थमध्ये विजयी सुरुवात केली आणि मालिकेत आघाडी घेतली. त्यानंतर यजमानांनी पलटवार करत टीम इंडियाचा धुव्वा उडवला आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांमध्ये उभयसंघातील तिसऱ्या सामन्यासाठी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आता या तिसऱ्या सामन्यात कोणता संघ विजय मिळवून आघाडी घेणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया तिसरा कसोटी सामना केव्हा?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया तिसरा कसोटी सामना शनिवार 14 डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया तिसरा कसोटी सामना कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया तिसरा कसोटी सामना द गाबा, ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया तिसऱ्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया तिसऱ्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 5 वाजून 20 मिनिटांनी टॉस होईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया तिसरा कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया तिसरा कसोटी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया तिसरा कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया तिसरा कसोटी सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेजलवुड.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.