भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु असून तीन सामने झाले आहेत. तिसरा सामना ड्रॉ झाल्याने मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. मालिका विजयासह उर्वरित दोन कसोटी सामन्यांवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी चौथ्या कसोटी सामन्यात वर्चस्व मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. मेलबर्न कसोटी सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाने कसून सराव सुरु केला आहे. 21 डिसेंबर रोजी भारतीय संघाचे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पहिले सराव सत्र होते. या सराव सत्रादरम्यान रवींद्र जडेजाने पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत रवींद्र जडेजाने हिंदीतच प्रश्नांची उत्तरं दिली. पत्रकार परिषद संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन पत्रकारांना जडेजाला इंग्रजीत प्रश्न विचारायचे होते. मात्र जडेजाने बस पकडण्याचा कारण सांगत पत्रकार परिषद सोडली.
वेळेअभावी भारतीय पत्रकारांनाही रवींद्र जडेजाला फारसे विचारण्याची संधी मिळाली नाही. दुसरीकडे, रवींद्र जडेजाने पत्रकार परिषद अर्धवट सोडल्याने ऑस्ट्रेलियन मिडिया जडेजावर नाराज दिसली. भारतीय संघाचे मिडिया मॅनेजर मौलिन पारीख यांनी त्यांना समजावून सांगितलं की, ही पत्रकार परिषद फक्त भारतीय मीडियासाठी आहे. पण ऑस्ट्रेलियन मीडियाची नाराजी कायम राहिली. इतकंच काय तर ऑस्ट्रेलियन पत्रकारांना भारतीय संघाच्या मिडिया मॅनेजरशी गैरवर्तन केलं. दुसरीकडे, भारतीय पत्रकारांना ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या पत्रकार परिषदेत अनेकदा प्रश्न विचारण्याची संधी मिळाली नाही. पण कधीच वाद किंवा गैरवर्तन केलं नाही.
💬💬 R Ashwin played with me like an on-field mentor#TeamIndia all-rounder Ravindra Jadeja reminisces about his partnership with R Ashwin. 👌👌#ThankyouAshwin | #AUSvIND | @imjadeja pic.twitter.com/3QGQFYztmB
— BCCI (@BCCI) December 21, 2024
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 28 कसोटी मालिका झाल्या आहेत त्यात भारताने 11 आणि ऑस्ट्रेलियाने 12 जिंकल्या आहेत. तर 5 मालिका ड्रॉ झाल्या आहेत. भारताने ऑस्ट्रेलियात 13 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात भारताने 2 सामन्यात विजय तर 8 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर तीन सामने ड्रॉ झाले आहेत. चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. तर पाचवा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे.