GT vs RCB, IPL 2022: बंगळुरूने गुजरातला दिले 171 धावांचे लक्ष्य, कोहली आणि रजतचे अर्धशतक

विराट कोहलीनेही आयपीएल कारकिर्दीतील 43 वे अर्धशतक झळकावले आहे. या मोसमातील त्याचे हे पहिलेच अर्धशतक आहे.

GT vs RCB, IPL 2022: बंगळुरूने गुजरातला दिले 171 धावांचे लक्ष्य, कोहली आणि रजतचे अर्धशतक
रजतचे अर्धशतकImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 5:59 PM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सामना सुरू आहे. पहिली इनिंग झाली असून  गुजरात टायटन्ससमोर बंगळुरूने 171 धावांचं लक्ष्य ठेवलंय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 6 गडी गमावून 170 धावा केल्या. बंगळुरूची सुरुवात खराब झाली. कर्णधार फाफ डू प्लेसिस दुसऱ्याच षटकात खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला प्रदीप संगवानने यष्टिरक्षक रिद्धिमान साहाच्या हाती झेलबाद केले. यानंतर विराट कोहलीने रजत पाटीदारसह दुसऱ्या विकेटसाठी 74 चेंडूत 99 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीने या मोसमातील पहिले अर्धशतक आणि आयपीएल कारकिर्दीतील 43 वे शतक झळकावले. त्याचवेळी रजतने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही झळकावले. रजत 32 चेंडूत 52 धावा काढून बाद झाला.

कोहलीने 47 चेंडूत अर्धशतक ठोकले

वेगवान गोलंदाज प्रदीप संगवानने हंगामातील आपला पहिला सामना खेळत असताना बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला यष्टिरक्षक रिद्धिमान साहाकडून झेलबाद केलं. डुप्लेसिस खातेही उघडता आले नाही. विराट कोहली फॉर्ममध्ये होता. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 53 वे अर्धशतक झळकावले. कोहलीने 47 चेंडूत अर्धशतक ठोकले. याआधी विराट कोहलीनेही आयपीएल कारकिर्दीतील 43 वे अर्धशतक झळकावले आहे. या मोसमातील त्याचे हे पहिलेच अर्धशतक आहे. यासोबतच कोहलीनेही फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. विराटच्या अर्धशतकावर पत्नी अनुष्का शर्मा आनंदी दिसत होती.

बेंगळुरूला दुसरा धक्का

15 व्या षटकात 110 धावांवर बेंगळुरूला दुसरा धक्का बसला. युवा फलंदाज रजत पाटीदार 32 चेंडूत 52 धावा काढून बाद झाला. त्याने पाच चौकार आणि दोन षटकार मारले. आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक आहे. रजतने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 74 चेंडूत 99 धावांची भागीदारी केली. रजत पाटीदार 52 धावा करून बाद झाला. राट कोहली 17व्या षटकात बाद झाला. त्याला मोहम्मद शमीने क्लीन बोल्ड केले. बाद होण्यापूर्वी कोहलीने 53 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 58 धावा केल्या. विराट कोहलीपाठोपाठ दिनेश कार्तिकही पॅव्हेलियनमध्ये परतला. कार्तिक फार काही करू शकला नाही आणि तीन चेंडूंत दोन धावा करून बाद झाला. हा सलग तिसरा सामना आहे जेव्हा कार्तिकची बॅट चालली नाही. रशीदच्या चेंडूवर कार्तिक शमीकरवी झेलबाद झाला. लोकी फर्ग्युसनने बेंगळुरू संघाला पाचवा धक्का दिला आहे. त्याने ग्लेन मॅक्सवेलला 33 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याचा झेल राशिद खानने घेतला.

हे सुद्धा वाचा

जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.