BAN vs AFG | मेहदी हसन-नजमूल शांतो जोडीचा शतकी धमाका, अफगाणिस्तानला विजयासाठी 335 रन्सचं टार्गेट
Afghanistan vs Bangladesh Asia Cup 2023 | बांगलादेश क्रिकेट टीमने आरपारच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या बॉलिंगच्या चिंढड्या चिंढड्या केल्या आहेत. बांगलादेशच्या नजमूल शांतो आणि मेहदी हसन या दोघांनी अफगाणिस्तानला झोडून काढलं.
लाहोर | बांगलादेश क्रिकेट टीमने मेहदी हसन आमि नजमूल शांतो या जोडीच्या शतकाच्या जोरावर अफगाणिनस्तानला विजयसाठी 335 रन्सचं मजबूत टार्गेट दिलंय. बांगलादेशने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 334 धावा केल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन आणि नजमूल शांतो या दोघांनी केलेल्या 194 धावांच्या विक्रमी भागीदारी आणि वैयक्तिक शतकांच्या जोरावर बांगलादेशला ‘करो या मरो’ सामन्यात 300 धावांचा टप्पा पार करता आला. या दोघांच्या धुलाईसमोर अफगाणिस्तानची गोलंदाजी सपशेल फोल ठरली.
बांगलादेशची बॅटिंग
बांगलादेशकडून मेहदी हसन याने सर्वाधिक 112 धावा केल्या. मेहदी हसन रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. मेहदीने 119 बॉलमध्ये 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 112 रन्स केल्या. नजमूल शांतो याने 105 बॉलमध्ये 104 धावांची खेळी केली. नजमूलने 2 सिक्स आणि 9 फोर ठोकले. या दोघांशिवाय इतरांना अपेक्षित सुरुवात मिळाली, मात्र त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही.
मोहम्मद नईम याने 28, मुशफिकर रहीम 25, कॅप्टन शाकिब अल हसन 32* आणि शमीम होसेन याने 11 धावा केल्या. अफिफ होसेन 4 धावांवर नाबाद परतला. तर तोहिद हृदॉय झिरोवर आऊट झाला. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि गुलाबदीन नईब या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. तर फझलहक फारुकी, करीन जनात, मोहम्मद नबी आणि राशिद खान या चौकडीला एकही विकेट घेता आली नाही.
अफगाणिस्तानसमोर 335 रन्सचं अवघड आव्हान
Centuries by Shanto and Miraz have powered Bangladesh to a formidable total of 332 in their must-win fixture!
Can Afghanistan come out all guns blazing and chase down this mammoth total? Or will Bangladesh secure their first win? 🤯#AsiaCup2023 #BANvAFG pic.twitter.com/LASXIegmLw
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 3, 2023
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), मोहम्मद नईम, नजमूल हुसेन शांतो, तोहिद हृदाय, शमिम होसेन, मुशफिकर रहिम (विकेटीपर), अफीफ होसेन, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, शोरिफूल इस्लाम आणि हसन महमुद
अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | हश्मतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरुबाझ (विकेटकीपर), इब्राहीम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नईब, करीम जनत, राशिद खान, फझलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान.