Cricket : ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रंगणार टी 20-वनडे सीरिजचा थरार, टीम इंडियाची घोषणा, कुणाला संधी?
Indian Cricket Team : वूमन्स टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता विंडिज विरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. बीसीसीआयने या दोन्ही मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे.
वूमन्स टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरली. वूमन्स ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 ने क्लिन स्वीप केलं. त्यानंतर आता टीम इंडिया मायदेशात विंडिज विरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत. बीसीसीआय निवड समितीने या दोन्ही मालिकांसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन देण्यात आली आहे.
निवड समितीने दोन्ही मालिकांसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. दोन्ही मालिकेत हरमनप्रीत कौर ही कर्णधार तर स्मृती मंधाना उपकर्णधार असणार आहे. टी 20 संघात विकेटकीपर बॅट्समन असलेल्या नंदीनी कश्यप हीला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. तर एकदिवसीय संघात प्रतिका रावल हीची वनडे सीरिजसाठी निवड करण्यात आली आहे. तर श्रेयांका पाटील, यास्तिका भाटीया आणि प्रिया पुनिया या तिघींना दुखापतीमुळे मुकावं लागलं आहे.
2 मालिका आणि 6 सामने
उभयसंघात टी 20i मालिकेतील तिन्ही सामने हे 15 ते 19 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहेत. हे सामने नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहेत. तर त्यानंतर 22 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान एकदिवसीय मालिका पार पडणार आहे. ही एकदिवसीय मालिका आयसीसी चॅम्पिनशीप अंतर्गत खेळवण्यात येणार आहेत. तर विंडिजने निवड समितीने 27 नोव्हेंबरलाच दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर केला होता.
टी 20i मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, रविवार 15 डिसेंबर, नवी मुंबई
दुसरा सामना, मंगळवार, 17 डिसेंबर, नवी मुंबई
तिसरा सामना, गुरुवार, 19 डिसेंबर, नवी मुंबई
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना (उपकर्णधार), नंदिनी कश्यप, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), उमा चेत्री (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सजना सजीवन, रघवी बिस्त, रेणुका सिंह ठाकूर, प्रिया मिश्रा, तीतस साधू, सायमा ठाकोर, मिन्नू मणी आणि राधा यादव.
भारतीय महिला संघ जाहीर
🚨 NEWS 🚨
India’s squad for IDFC First Bank T20I & ODI series against West Indies announced.
All The Details 🔽 #TeamIndia | #INDvWI https://t.co/2Vf8Qbix76
— BCCI Women (@BCCIWomen) December 13, 2024
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, रविवार 22 डिसेंबर, रिलायन्स स्टेडियम, बडोदा
दुसरा सामना, मंगळवार 24 डिसेंबर, रिलायन्स स्टेडियम, बडोदा
तिसरा सामना, शुक्रवार 27 डिसेंबर, रिलायन्स स्टेडियम, बडोदा
एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रतिका रावल, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, रिचा घोष (विकेटकीपर), उमा चेत्री (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तीतस साधू, सायमा ठाकोर आणि रेणुका सिंह ठाकुर.
टी 20i आणि वनडे सीरिजसाठी विंडिज टीम : हेली मॅथ्यूज (कर्णधार), शेमाइन कॅम्पबेल (उपकर्णधार), आलिया एलेने, शमिलिया कोनेल, नेरिसा क्राफ्टन, डिआंड्रा डॉटिन, ऍफी फ्लेचर, शबिका गजनबी, चिनेल हेन्री, झायदा जेम्स, कियाना मॅन जोसेफ, अश्मिनी मुनिसार, करिश्मा रामहरक आणि रशादा विल्यम्स.