मुंबई | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी मालिकेला 12 जुलैपासून सुरुवात झालीय. या दरम्यान क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा लेक याच्याबाबत अपडेट आली आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या अर्जून तेंडुलकर याचं नशीब फळफळंय. अर्जुनची टीममध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामुळे अर्जुनच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
देवधर ट्रॉफी स्पर्धेला 24 जुलैपासून सुरुवात होतेय. या देवधर ट्रॉफीचं तब्बल 4 वर्षांनंतर आयोजन करण्यात आलंय. या देवधर ट्रॉफीसाठी साऊथ झोनने संघ जाहीर केलाय. या स्पर्धेत मयंक अग्रवाल हा साऊथ झोनचं नेतृत्व करणार आहे. तसेच या टीममध्ये अर्जुन तेंडुलकर याची निवड करण्यात आली आहे. अर्जुनची या स्पर्धेत साऊथ झोनकडून खेळण्याची पहिलीच वेळ ठरणार आहे.
अर्जुनला यंदा तब्बल 2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयपीएल 16 व्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाची संधी मिळाली. मात्र अर्जुनला काही सामन्यानंतर टीममधून वगळण्यात आलं. अर्जुनला फारशी संधी देण्यात आली नाही. मात्र त्यानंतरही अर्जुन न खचता स्वत:ची कामगिरी सुधारण्यासाठी सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतोय. त्यामुळे अर्जुनच्या कामगिरीकडे अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचं लक्ष असणार आहे.
साऊथ झोनकडून अर्जुन व्यतिरिक्त अरुण कार्तिक आणि साई किशोर या आणि इतर खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. कार्तिक आणि किशोन या दोघांनी टीएनपीएल अर्थात तामिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती.
तर केरळच्या रोहन कुन्नुमल याला साऊथ झोन संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. इतकंच नाही, तर एन जगदीशन यालाही संधी दिली गेली आहे.
मयंक अग्रवाल (कॅप्टन), रोहन कुन्नुमल (उपकर्णधार), एन जगदीसन (विकेटकीपर), रोहित रायडू, केबी अरुण कार्तिक, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, वी कावेरप्पा, वी वैश्यक, अर्जुन तेंडुलकर, कौशिक वी, मोहित रेडकर, सिजोमन जोसेफ, आणि साई किशोर.