नवी दिल्ली : भारतीयांनी मोकळ्या आणि मोठ्या मनाने पाकिस्तानी टीमच स्वागत केलं. सध्या सुरु असलेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तानी टीम भारतात आलीय. भारत आणि पाकिस्तानचे राजकीय संबंध सर्वश्रृत आहेतच. पाकिस्तानने वारंवार भारतावर दहशतवादी हल्ले केले आहेत. मात्र, या गोष्टी मागे ठवून भारतीयांनी खेळ भावना जपली. पाकिस्तानी टीमच स्वागत केलं. आता भारतातील एका शहरात पाकिस्तानी जीतेगाच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच समर्थन करण्यात आलय. हा व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतोय. उद्या टीम इंडियाचा सामना परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध आहे. काहीही करुच जिंकाच अशीच दोन्ही बाजूच्या चाहत्यांची भावाना असणार. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची बाजू वरचढ आहे. टीम इंडियाने आतापर्यंत प्रत्येक वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पराभूत केलय.
भारतात पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा कुठल्या शहरात आणि कुठल्या मॅचमध्ये देण्यात आल्या?. त्याबद्दल जाणून घ्या. हैदराबादमध्ये पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्या गेल्या. पाकिस्तानचा हा सामना श्रीलंकेविरुद्ध होता. 55000 प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियममध्ये या सामन्यात आयोजन करण्यात आलं होतं. स्टेडियम पूर्णपणे भरलेलं नव्हतं. पण जितकेही लोक सामना पाहण्यासाठी आले होते, त्यातील बहुतांश पाकिस्तान समर्थक होते. श्रीलंकेने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 50 ओव्हरमध्ये 344 धावांचा डोंगर उभारला. पाकिस्तानला विजयासाठी 345 धावांच टार्गेट मिळाल होतं. पाकिस्तान एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुडघे टेकेल असं सुरुवातीला वाटलं. कारण वर्ल्ड कपच्या इतिहासात कधीही इतक्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग झालेला नाहीय.
पाकिस्तान जीतेगाच्या भरपूर घोषणा
बाबर आजमचा विकेट गेल्यानंतर आता पाकिस्तानसाठी सर्वकाही संपलं असच वाटत होतं. त्यावेळी मोहम्मद रिजवान आणि अब्दुल्लाह शफीक हिरो बनून समोर आले. पाकिस्तान टीमने वर्ल्ड कपमध्ये ते करुन दाखवलं, जे कुठल्याही टीमला जमलं नव्हतं. पाकिस्तानची टीम मैदानात खेळत असताना स्टेडियममध्ये त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. भारतात पाकिस्तानला सपोर्ट मिळणार नाही, अशी अपेक्षा असते. पण हैदराबादमध्ये असं दिसलं नाही. श्रीलंकेविरुद्ध सामन्याच्यावेळी प्रेक्षक गॅलरीतून पाकिस्तान जीतेगाच्या भरपूर घोषणा देण्यात आल्या.