ENG vs AUS : बेन डकेटचं ऑस्ट्रेलिया विरुद्ध विस्फोटक शतक, रोहित शर्माला पछाडलं

| Updated on: Sep 29, 2024 | 7:07 PM

England vs Australia 5th Odi: इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट याने निर्णायक सामन्यात शतकी खेळी करत रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांना मागे टाकलं आहे.

ENG vs AUS : बेन डकेटचं ऑस्ट्रेलिया विरुद्ध विस्फोटक शतक, रोहित शर्माला पछाडलं
ben duckett century
Follow us on

ENG vs AUS : बेन डकेटचं ऑस्ट्रेलिया विरुद्ध विस्फोटक शतक, रोहित शर्माला पछाडलं

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना ब्रिस्टल येथे खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्हन स्मिथ याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय केला. इंग्लंड टीम टॉस गमावून बॅटिंगसाठी भाग पाडलं. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट याने विस्फोटक शतक केलं आहे. बेन डकेट याने या शतकी खेळीसह टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि ओपनर शुबमन गिल या दोघांना मागे टाकलं.

डकेटने 86 बॉलमध्ये 13 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने शतक पूर्ण केलं. डकेटच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे दुसरं शतक ठरलं. डकेटने 32 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर 1 धाव घेत शतक पूर्ण केलं. डकेटचं या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात अवघ्या 5 धावांनी शतक हुकलं होतं. मात्र डकेटने पाचव्या सामन्यात शतक केलं. तर डकेटने चौथ्या सामन्यात 63 धावांची अर्धशतकी खेळी केली.

रोहित-शुबमनला पछाडलं

डकेटने या शतकी खेळीच्या जोरावर 2024 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याबाबत रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांना मागे टाकलं. डकेटला शतकाचं मोठ्या आकड्यात रुपांतर करण्याची संधी होती. मात्र डकेट 7 धावा जोडल्यानंतर माघारी परतला. डकेटने 91 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 107 धावा केल्या.

बेन डकेट 2024 या वर्षात 1 हजार आंतरराष्ट्रीय (टेस्ट+वनडे+टी20i) धावा करणारा सहावा फलंदाज ठरला आहे. डकेटने यासह जो रुट याला मागे टाकलं. रुटने या वर्षात 986 धावा केल्या आहेत. तसेच डकेट या वर्षात इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

2024 मध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारे फलंदाज

  1. कुसल मेंडीस – 1290
  2. कामिंदु मेंडीस – 1210
  3. पाथुम निसांका – 1165
  4. यशस्वी जयस्वाल – 1099
  5. बेन डकेट – 1002*
  6. रोहित शर्मा – 1001

डकेटचा शतकी  धमाका

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : हॅरी ब्रूक (कॅप्टन), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, मॅथ्यू पॉट्स, ऑली स्टोन आणि आदिल रशीद.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, कूपर कोनोली, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.