Prithvi Shaw | पृथ्वी शॉ याचा तडाखा सुरुच, द्विशतकानंतर आता झंझावाती शतक

| Updated on: Aug 13, 2023 | 11:31 PM

Prithvi Shaw Century | पृथ्वी शॉ याने काही दिवसांपूर्वी द्विशतक ठोकलं होतं. आता पृथ्वीने पुन्हा शतक ठोकून निवड समितीला पुन्हा सडेतोड उत्तर दिलं आहे.

Prithvi Shaw | पृथ्वी शॉ याचा तडाखा सुरुच, द्विशतकानंतर आता झंझावाती शतक
Follow us on

डरहम | इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वनडे कप स्पर्धेत टीम इंडियाचा सलामीवीर मुंबईकर पृथ्वी शॉ याने आपला झंझावात कायम ठेवलाय. पृथ्वीने 9 ऑगस्ट रोजी समरसेटवर विरुद्ध द्विशतकी खेळी केली. पृथ्वी शॉ याच्या या द्विशतकाच्या जोरावर नॉर्थहॅम्प्टनशायर टीमने समरसेटचा 87 धावांनी धुव्वा उडवला होता. पृथ्वीने आता त्या द्विशतकानंतर डरहम विरुद्ध झंझावाती शतक ठोकत टीमला जिंकवलंय. पृथ्वीच्या शतकाच्याच्या जोरावर डरहमने विजयासाठी दिलेलं 199 धावांचं आव्हान हे अवघ्या 26 धावांच्या आतच पूर्ण केलं.

199 धावांचा पाठलाग करताना पृथ्वी ओपनिंगला आला. पृथ्वीने सुरुवातीपासून दे दणादण बॅटिंग सुरु केली ती मॅच संपल्यानंतरच थांबवली. विजयी आव्हानाचं पाठलाग करताना नॉर्थहॅम्प्टनशायरने 4 विकेट्स गमावल्या. मात्र पृथ्वी डगमगला नाही. पृथ्वीने एका बाजूने झंझावात सुरुच ठेवला होता. पृथ्वीने डरहमवर हल्लाबोल केला.

हे सुद्धा वाचा

पृथ्वीने अवघ्या 76 बॉलमध्ये 15 चौकार आणि 7 कडकडीत सिक्सच्या मदतीने नाबाद 125 धावा चोपल्या. पृथ्वी शॉ याच्या जबरदस्त शोमुळे नॉर्थहॅम्प्टनशायर क्रिकेट टीमने ही मॅच अवघ्या 4 विकेट्स गमावून 25.4 ओव्हरमध्ये जिंकली. रॉब कियोग याने पृथ्वीला चांगली साथ दिली. रॉबने 40 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्ससह 42 धावांची खेळी केली.

पृथ्वी शॉ याचं शतक

दरम्यान पृथ्वी शॉ याच्या द्विशतक आणि शतकानंतर निवड समिती त्याला संधी देणार का, असा प्रश्न आता क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे निवड समिती पृथ्वीचा किती गांभीर्याने विचार करते, याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

नॉर्थहॅम्प्टनशायर प्लेईंग इलेव्हन | लुईस मॅकमॅनस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, एमिलियो गे, सॅम व्हाइटमन, टॉम टेलर, ल्यूक प्रॉक्टर, रॉब किओघ, सायमन केरिगन, जस्टिन ब्रॉड, जेम्स सेल्स आणि जॅक व्हाईट.

डरहम प्लेईंग इलेव्हन | अॅलेक्स लीस (कॅप्टन), ग्रॅहम क्लार्क (विकेटकीपर), डेव्हिड बेडिंगहॅम, मायकेल जोन्स, बेन मॅककिनी, जोनाथन बुशनेल, स्कॉट बोर्थविक, पॉल कफलिन, लियाम ट्रेव्हस्किस, मिगेल प्रिटोरियस आणि जॉर्ज ड्रिसेल.