GT vs CSK IPL 2023 Final : Reserve Day च्या दिवशी मॅच झाली नाही, मग चॅम्पियन कोण, हे कसं ठरवणार?

IPL 2023 Final on Reserve Day : पावसामुळे काल IPL 2023 चा फायनल सामना होऊ शकला नाही. आज अहमदाबादमधल हवामान कसं असेल? यावर क्रिकेटप्रेमींच लक्ष असणार आहे.

GT vs CSK IPL 2023 Final :  Reserve Day च्या दिवशी मॅच झाली नाही, मग चॅम्पियन कोण, हे कसं ठरवणार?
GT vs CSK IPL 2023 Final on reserve dayImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 8:00 AM

अहमदाबाद : IPL 2023 च्या सीजनची फायनल मॅच रिझर्व्ह डे च्या दिवशी होणार आहे. 29 मे म्हणजे आज फायनलसाठी राखून ठेवलेला रिझर्व्ह डे आहे. आधी ठरल्याप्रमाणे फायनलसाठी मैदान तेच असणार आहे. हवामानाची स्थिती काय असेल? हा प्रश्न आहे. अहमदाबादमद्ये रविवारसारखी हवामानाची स्थिती राहिली तर काय? हा प्रश्न आहे. रिझर्व्ह डे च्या दिवशी सुद्धा मॅच झाली नाही तर काय? IPL चा नवीन चॅम्पियन कसा निवडला जाणार?

पावसामुळे काल IPL 2023 चा फायनल सामना होऊ शकला नाही. 28 मे ही फायनलसाठी निर्धारित केलेली तारीख होती. काल चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्समध्ये फायनल मॅच सुरु होणार होती, पण तितक्यात पाऊस सुरु झाला.

हे असं पहिल्यांदा घडणार?

एकदा सुरु झालेला पाऊस थांबला नाही, त्यामुळे सामना रिझर्व्ह डे च्या दिवशी खेळवण्याचा निर्णय घ्यावा लागला. IPL फायनल रविवारी न होऊन इतर दिवशी होणार आहे. सोमवारी खेळली जाणारी ही पहिली आयपीएल फायनल आहे.

रिझर्व्ह डे च्या दिवशी फायनल झाली नाही तर काय?

आता क्रिकेटप्रेमींच्या मनात हा प्रश्न आहे की, आजही पाऊस कोसळला तर काय? मग गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन टीममधून चॅम्पियन कसा निवडणार? कारण काल पावसाने IPL 2023 च्या फायनलवर पाणी फिरवलं होतं. आजही पाऊस झाल्यास ही टीम चॅम्पियन बनेल

रिझर्व्ह डे च्या दिवशी पाऊस झाला आणि मॅच होऊ शकली नाही, तर विजेत्याचा निर्णय पॉइंट्स टेबलच्या आधारावर घेतला जाईल. म्हणजे पॉइंट्स टेबलध्ये जी टीम पहिल्या स्थानावर आहे, त्यांना विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. म्हणजेच गुजरात टायटन्सची टीम न खेळताच विजेता म्हणून निवडली जाईल. चेन्नईची टीम पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.