6,0,6,6,4,6..! हार्दिक पांड्याचा झंझावात, एका षटकात ठोकल्या 28 धावा, पाहा Video
सैयद मुश्ताक अली स्पर्धेत भारताच्या दिग्गज खेळाडूचा आक्रमक पवित्रा दिसत आहे. श्रेयस अय्यर, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांचा झंझावात सुर आहे. हार्दिक पांड्या या स्पर्धेत गोलंदाजांची धुलाई करत सुटला आहे. प्रत्येक सामन्यात आक्रमक फलंदाजी करत आहे.
हार्दिक पांड्या सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. सैयद मुश्ताक अली स्पर्धेत त्याचा झंझावात पाहायला मिळत आहे. पांड्या क्रीझवर आला की प्रतिस्पर्धी संघाची धुलाई हे समीकरण झालं आहे. क्रीडारसिकांच्या अपेक्षेप्रमाणे हार्दिक पांड्या फलंदाजी करत आहे. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत आहे. एखादा गोलंदाज पट्ट्यात सापडला तर त्याची धुलाई करण्याची संधी हार्दिक पांड्या काही सोडत नाही. त्रिपुरा विरूद्धच्या सामन्यात एकाच षटकात 28 धावा ठोकल्या. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात एकाच षटकात 29 धावा ठोकल्या होत्या. बरोडाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्रिपुराने 20 षटकात 9 गडी गमवून 109 धावा केल्या आणि विजयासाठी 110 धावांचं आव्हान दिलं. बरोडाने हे आव्हान 11.2 षटकात पूर्ण केलं.
त्रिपुराने दिलेल्या 110 धावांचा पाठलाग करताना बरोडाने 5.3 षटकात 2 गडी गमवून 39 धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी हार्दिक पांड्या आला.9 षटकात 2 गडी बाद 68 धावा होत्या. हार्दिक पांड्या 16 चेंडूत 19 धावा करून खेळत होता. परवेझ सुल्तान गोलंदाजीला आला. तेव्हा पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार मारला. दुसरा चेंडू निर्धाव गेल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर षटकार मारला. पाचव्या चेंडूवर विकेटच्या मागे चौकार आला आणि सहाव्या चेंडूवर पु्न्हा एकदा षटकार मारला. असं करत हार्दिक पांड्याने एकाच षटकात 28 धावा ठोकल्या. संघाची धावसंख्या 68 वरून थेट 96 वर पोहचली.
🚨 HARDIK PANDYA SMASHED 28 RUNS IN A SINGLE OVER IN SMAT. 🚨
– The Madness of Pandya…!!!! pic.twitter.com/1DrY1vb5Ff
— Johns. (@CricCrazyJohns) November 29, 2024
त्यामुळे हार्दिक पांड्या आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. हार्दिक पांड्याने एका षटकात धावा केल्या असं नाही. तर गुजरात विरुद्ध 35 चेंडूत नाबाद 74, उत्तराखंडविरुद्ध 21 चेंडूत नाबाद 41, तामिळनाडूविरुद्ध 30 चेंडूत 69 आणि त्रिपुराविरुद्ध 23 चेंडूत 47 धावांची खेळी केली.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
त्रिपुरा (प्लेइंग इलेव्हन): सम्राट सूत्रधर, श्रीदाम पॉल, मनदीप सिंग (कर्णधार), श्रीनिवास शरथ (विकेटकीपर), अजय सरकार, रजत डे, मणिशंकर मुरासिंग, सौरभ दास, शंकर पॉल, रियाझ उद्दीन, परवेझ सुलतान.
बडोदा (प्लेइंग इलेव्हन): मितेश पटेल (विकेटकीपर), विष्णू सोलंकी, शिवालिक शर्मा, हार्दिक पांड्या, कृणाल पंड्या (कर्णधार), भानू पानिया, निनाद अश्विनकुमार रथवा, अतित शेठ, महेश पिठिया, लुकमान मेरीवाला, अभिमन्यू सिंग राजपूत