चेन्नई: टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज, विकेटकीपर दिनेश कार्तिकने सोशल मीडियावर एका पोस्ट केलीय. या पोस्टमुळे त्याच्या निवृत्तीचा चर्चा सुरु झाली आहे. दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनधिकृत निवृत्ती घेतल्याच बोललं जातय. दिनेश कार्तिकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात त्याने एक मोठी कॅप्शन दिलीय. दिनेशने या पोस्टमध्ये टी 20 वर्ल्ड कप खेळण्याच्या स्वप्नाबद्दल लिहिलं आहे. त्यावरुनच त्याच्या निवृत्तीच्या चर्चेने जोर पकडलाय.
ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब
स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत केल्याबद्दल दिनेश कार्तिकने टीममधील सहकारी, कोच, मित्र आणि चाहत्यांचे आभार मानलेत. “भारताकडून टी 20 वर्ल्ड कप खेळण्याच लक्ष्य पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केली. ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. आम्ही लक्ष्य गाठण्यात कमी पडलो. पण आयुष्यभर लक्षात राहतील, अशा अनेक आठवणी माझ्याकडे आहेत. सहकारी खेळाडू, कोच, मित्रपरिवार आणि खासकरुन चाहत्यांचे मी आभार मानतो. तुम्ही सगळे माझ्या पाठिशी उभे राहिलात” असं दिनेश कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.
म्हणून वर्ल्ड कप टीममध्ये मिळालं स्थान
दिनेश कार्तिकने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून आयपीएल 2022 मध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळेच त्याला टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळालं. टीममध्ये त्याचा रोल फिनिशरचा होता. हेड कोच राहुल द्रविड यांनी आधीच स्पष्ट केलं होतं.
वर्ल्ड कपमध्ये कार्तिकने किती धावा केल्या?
दिनेश कार्तिकला या वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली. पण तो प्रभावी कामगिरी करु शकला नाही. कार्तिक चार सामने खेळला. त्याने 3 इनिंगमध्ये एकूण 14 धावा केल्या. तीन इनिंगमध्ये त्याला फक्त एक चौकार मारता आला. लीग सामन्यातील खराब कामगिरीमुळे इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल मॅचमध्ये त्याला अंतिम 11 मध्ये स्थान मिळू शकलं नाही.