रोहित शर्माला भारतीय संघाचं कर्णधारपद कसं मिळालं? सौरव गांगुलीने केला मोठा खुलासा

| Updated on: Nov 10, 2023 | 5:38 PM

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी केली आहे. साखळी फेरीतील शेवटचा सामना 12 नोव्हेंबरला नेदरलँड विरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी सौरव गांगुलीने मोठा खुलासा केला आहे. काय म्हणाला ते वाचा..

रोहित शर्माला भारतीय संघाचं कर्णधारपद कसं मिळालं? सौरव गांगुलीने केला मोठा खुलासा
रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत सौरव गांगुलीने उघड केलं गुपित, पडद्यामागच्या घडामोडींबाबत स्पष्टच सांगितलं
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु आहे. साखळी फेरीतील 8 पैकी 8 सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. 15 नोव्हेंबरला भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया वनडे वर्ल्डकप जिंकेल, अशी आशा आता क्रीडाप्रेमींना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने आशिया कप स्पर्धेतही चांगली कामगिरी केली होती. आता साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत विरुद्ध नेदरलँड यांच्यात होत आहे. या सामन्यापूर्वी माजी कर्णधार सौरव गांगुली याने कर्णधारपदाबाबत एक खुलासा केला आहे. सौरव गांगुली याने एका चॅनेलशी बोलताना हे वक्तव्य केलं. रोहित शर्मा याला कर्णधारपद नको होतं असं सौरव गांगुली याने सांगितलं आहे.

“रोहित शर्मा याला कर्णधारपद नको होतं. कारण त्याच्यावर सर्व फॉर्मेटमध्ये खेळण्याचा दबाव होता. पण बाब इतक्या टोकावर आली होती की, मी त्याला सांगितलं कर्णधारपद घ्यावंच लागेल. मी तुझ्या नावाची घोषणा करतो. त्यानंतर त्याने आव्हान म्हणून ही बाब स्वीकारली. आता मला आनंद होत आहे की तो भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवत आहे. वर्ल्डकपमध्ये तो टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. त्याचा निकाल पाहात आहात.”, असं सौरव गांगुली याने सांगितलं.

विराट कोहली याने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा याच्याकडे तिन्ही फॉर्मेटचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. त्याच्या कर्णधारपदात टीम इंडियाने चांगली प्रगती केली. रोहित शर्मा वनडे आणि कसोटी सामन्यात संघाचं नेतृत्व करत आहे. तर टी20 क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या कर्णधारपदाची भूमिका बजावत आहे. आता वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद दृष्टीक्षेपात आहे. त्यामुळे भारतीय संघ तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकेल अशी आशा आहे. तसेच 12 वर्षांचा दुष्काळ दूर करेल अशी चर्चा आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, इशान किशन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.