IND vs AUS : दुसऱ्या दिवस अखेर भारत मजबूत स्थितीत, केएल राहुल-यशस्वी जयस्वाल यांचं नाबाद अर्धशतक
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थिती असल्याचं दिसत आहे. पहिल्या डावात गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. त्यानंतर फलंदाजीतही भारतीय खेळाडूंनी कमाल केली. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी दीड शतकी भागीदारी केली. तसेच भारताने 218 धावांपर्यंत मजल मारली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने गाजवला. पहिल्या डावात भारताने 150 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. ऑस्ट्रेलियाला सर्वबाद 104 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडे पहिल्या डावात 46 धावांची आघाडी होती. या आघाडीसह भारतीय संघाने दुसऱ्या डावात साजेशी खेळी केली. पहिल्या डावात फेल गेलेल्या यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून 150 हून अधिक धावांची भागीदारी केली. भारताने दुसऱ्या दिवसअखेर एकही गडी न गमवता 172 धावा केल्या. त्यामुळे 46 धावांची आघाडी पकडून भारताच्या 218 धावा झाल्या आहेत. केएल राहुल नाबाद 62, तर यशस्वी जयस्वाल नाबाद 90 धावांवर खेळत आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी यशस्वी जयस्वालचं शतक पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.
यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी नाबाद अर्धशतकं झळकावून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पिसं काढली. सुरुवातीला यशस्वी जयस्वाने मैदानात तग धरून ठेवला. तसेच सावधपणे खेळी करत गेला. अर्धशतक झळकवण्यासाठी यशस्वी यशस्वालने 100 हून अधिक चेंडूंचा सामना केला. विशेष म्हणजे 2000 या वर्षानंतर पहिल्यांदाच म्हणजे 24 वर्षांनी ओपनिंग जोडीने ऑस्ट्रेलियात 50 हून अधिक षटकांचा सामना केला. दरम्यान, केएल राहुलनेही दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकलं.
ओपनिंगला उतरत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही बॅटर्सने अर्धशतक ठोकणारी चौथी जोडी आहे. सुनिल गावस्कर-चेतन चौहाना यानी 1981 मध्ये, सुनिल गावस्कर आणि ख्रिस श्रीकांत यांनी 1985 मध्ये, सुनिल गावस्कर आणि ख्रिस श्रीकांत यांनी 1986 मध्ये या जोडीने अर्धशतकी खेळी केली होती. आता 2024 मध्ये केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालने अर्शतक ठोकलं आहे.
यशस्वी जयस्वाल एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरली आहे. यापूर्वी ब्रेंडन मॅकलमने 2014 मध्ये 33 षटकार मारले होते. आता यशस्वी जयस्वालने 33 षटकार मारत या विक्रमाची बरोबरी साधली आहे.