IND vs BAN 2nd Test: इंडिया बांगलादेशचा धुव्वा उडवण्यासाठी तयार, दुसरा आणि अंतिम सामना कुठे?

| Updated on: Sep 26, 2024 | 10:08 PM

India vs Bangladesh 2nd Test Live Streaming: टीम इंडिया बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तर आता दोन्ही संघ दुसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी सज्ज आहेत.

IND vs BAN 2nd Test: इंडिया बांगलादेशचा धुव्वा उडवण्यासाठी तयार, दुसरा आणि अंतिम सामना कुठे?
team india test
Image Credit source: Bcci
Follow us on

टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध दुसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यासह बांगलादेशला 2-0 ने क्लीन स्वीप करण्यासाठी कसून सराव केला आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे. अशात क्रिकेट चाहत्यांना या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहेत. तर नजमुल हुसेन शांतोकडे बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार? हे आपण जाणून घेऊयात.

भारत-बांगलादेश दुसरा कसोटी सामना केव्हा?

भारत-बांगलादेश दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

भारत-बांगलादेश दुसरा कसोटी सामना कुठे?

भारत-बांगलादेश दुसरा कसोटी सामना हा कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियममध्ये होणार आहे.

भारत-बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

भारत-बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्याला 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 9 वाजता टॉस होईल.

भारत-बांगलादेश दुसरा कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?

भारत-बांगलादेश दुसरा कसोटी सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

भारत-बांगलादेश दुसरा कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?

भारत-बांगलादेश दुसरा कसोटी सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद नाहिद राणा, महमुदुल हसन जॉय, जाकेर अली, खालेद अहमद, तैजुल इस्लाम आणि नईम हसन.