IND vs BAN: बांगलादेशने पहिल्याच दिवशी लाज घालवली, टीम इंडिया विरुद्ध 56 वर्षांनी पुन्हा तसंच घडलं

| Updated on: Sep 27, 2024 | 8:21 PM

India vs Bangladesh 2nd Test Day 1: भारत-बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस पावसाने गाजवला. पावसामुळे फक्त 35 ओव्हरचाच खेळ होऊ शकला. साम्यात या दरम्यान बांगलादेश विरुद्ध 56 वर्षांनी काय घडलं?

IND vs BAN: बांगलादेशने पहिल्याच दिवशी लाज घालवली, टीम इंडिया विरुद्ध 56 वर्षांनी पुन्हा तसंच घडलं
team india test cricket
Image Credit source: Bcci
Follow us on

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस हा पावसाच्या नावावर राहिला. पावसाने सामन्याआधीच बॅटिंगला सुरुवात केली. याच पावसामुळे दिवसाचा संपूर्ण खेळ होऊ शकला नाही. तसेच पावसाने खळादरम्यानही व्यत्यय आणल्याने क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला. पावसामुळे एका तासाच्या विलंबाने टॉस झाला. तसेच त्यानंतर पावसाने पहिल्या आणि दुसऱ्या सत्रातही व्यत्यय आणला. दुसर्‍या सत्रात पावसामुळे खेळ थांबवला. मात्र जोरदार पावसामुळे अखेर पहिल्या दिवसाचा खेळ संपल्याचं जाहीर करण्यात आलं. बांगलादेशने खेळ संपेपपर्यंत 35 षटकांमध्ये 3 विकेट्स गमावून 107 धावा केल्या.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि इतिहास घडला. रोहित कानपूरमध्ये टॉस जिंकून 60 वर्षांनी फिल्डिंग करणारा पहिला कर्णधार ठरला. याआधी मन्सूर अली खान पटौदी यांनी 1964 साली असाच निर्णय घेतला होता. तेव्हा पटौडी यांनी नाणेफेक जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं होतं. भारतीय गोलंदाजांनी कॅप्टन रोहित शर्माचा बॉलिंग करण्याचा निर्णय योग्य ठरवला. आकाश दीप याने त्याच्या कोट्यातील पहिल्याच षटकात झाकीर हसन याला भोपळाही फोडू दिला नाही. विशेष बाब म्हणजे झाकीरला 24 बॉल खेळूनही एकही धाव करचा आली नाही. आकाश दीपच्या नावावर मोठा विक्रम झाला आहे.

झाकीर 20 बॉल खेळल्यानंतरही भोपळा न फोडू शकणारा चौथा बांगलादेशी फलंदाज ठरला आहे. झाकीरआधी 16 वर्षांपूर्वी न्यूझीलंडच्या जेकब ओरमने आफताब अहमद याला झिरोवर आऊट केलं होतं. बांगलादेश न्यूझीलंड यांच्यात 2008 साली हा कसोटी सामान झाला होता. तेव्हा आफताब अहमद याला 25 चेंडू खेळूनही धावांचं खातं उघडता आलं नव्हतं.

तसेच झाकीर टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक चेंडू खेळून शू्न्यावर बाद होणारा पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी इयन चॅपल यांच्या नावावर हा नकोसा विक्रम होता. चॅपल 1968 साली सिडनीत 22 बॉल खेळल्यानंतर एकही धाव न करता आऊट झाले होते.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग इलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद आणि खालेद अहमद