IND vs BAN Toss | बांगलादेशने टॉस जिंकला, टीम इंडिया चौथ्या विजयासाठी सज्ज
India vs Bangladesh Toss | टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये सलग चौथ्या मॅचमध्ये चौथ्यांदा विजयी धावांचा पाठलाग करणार आहे. बांगलादेशने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकला आहे.
पुणे | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 17 व्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने या 13 व्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत अजिंक्य आहे. टीम इंडियाने पैकीच्या पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशने 3 पैकी 2 सामने गमावून 1 जिंकला आहेत. त्यामुळे बांगलादेश दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. तर टीम इंडियाचा विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे.
दरम्यान दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला आहे. बांगलादेशने टॉस जिंकला आहे. कॅप्टन नजमूल हुसेन शांतो याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचा नियमित कर्णधार हा दुखापतीमुळे टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात खेळत नाहीये. “शाकिबला खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही त्याला विश्रांतीचा सल्ला दिलाय” अशी माहिती बांगलादेश टीमचे मॅनेजर यांनी दिली आहे. त्यामुळे टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यासाठी नजमुल हुसैन शांतो याच्याकडे बांगलादेशची सूत्रं देण्यात आली आहे.
प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल
टीम इंडियाने बांगलादेश विरुद्धच्या या लढाईसाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर बांगलादेशने टीममध्ये 2 बदल केले आहेत. टीम इंडिया यंदाच्या वर्ल्ड कपमधील सलग चौथ्या सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करणार आहे. टीम इंडियाने तिन्ही सामने चेसिंग करुन जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडिया ही विजयी चौकार लगावेल, अशी आशा टीम इंडियाच्या चाहत्यांना आहे.
टीम इंडियाचे 11 शिलेदार
🚨 Toss & Team News 🚨
Bangladesh have elected to bat against #TeamIndia.
A look at India’s Playing XI 🔽
Follow the match ▶️ https://t.co/GpxgVtP2fb#CWC23 | #INDvBAN | #MeninBlue pic.twitter.com/RuFBkS8XMj
— BCCI (@BCCI) October 19, 2023
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), लिटॉन दास, तंझिद हसन, मेहदी हसन मिराज, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपरयू), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान आणि शरीफुल इस्लाम.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (डब्ल्यू), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.