IND vs BAN | Tanzid Hasan क्लिअर Out, टीम इंडियाला समजलंच नाही, एक चूक महागात
India Missed Lbw Review Tanzid Hasan | टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध सुरुवातीलाच आपल्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली. बांगलादेशचा तांझिद क्लिअर आऊट होता मात्र कुणाला समजलंच नाही.
पुणे | तंत्रज्ञानाच्या युगात क्रिकेटमध्ये कोणताही खेळाडू हा वाचू शकत नाही. अंपायरचा निर्णय आधी अंतिम असायचा. मात्र तसं नाही. क्रिकेट टीमला निर्णय मान्य नसेल, तर डीआरएस घेता येतो. खेळाडू किंवा टीम कर्णधाराच्या परवानगीने रिव्हीव्यू घेऊ शकतो. त्यामुळे कुणालाही चुकीच्या निर्णयाचा फटका सोसावा लागत नाही. मात्र टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये बांगलादेश विरुद्ध घोडचूक केलीय. टीम इंडियाला ही एक घोडचूक तब्बल 45 धावांनी महागात पडली आहे. नक्की काय झालं ते आपण सविस्तर जाणून घेऊयात.
बांगलादेशने टीम इंडिया विरुद्ध सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. बांगलादेशकडून लिटॉन दास आणि तांझिद हसन सलामी जोडी मैदानात आली. दोघांनी सावध सुरुवात केली. बांगलादेशने बिनबाद 4 ओव्हरमध्ये 6 धावा केल्या. जसप्रीत बुमराह बांगलादेशच्या डावातील पाचवी ओव्हर टाकायला आला. टीम इंडियाला या पाचव्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली होती. तांझिद हसन क्लिअर एलबीडब्ल्यू आऊट होता. मात्र कुणीच अपिल केली नाही. इतकंच काय बॉलर बुमराहनेही हु की चु केलं नाही. त्यामुळे तांझिदला 6 धावांवर जीवनदान मिळालं.
नक्की काय झालं?
जसप्रीत बुमराह 140.6 च्या स्पीडने यॉर्कर टाकला. बुमराहने टाकलेला बॉल तांझिंदच्या पॅडला आणि मग बॅटला लागला. मात्र बॉल तांझिदच्या पॅडला आधी नंतर बॅटला लागलाय हे कुणालाच लक्षात आलं नाही. त्यामुळे टीम इंडियाकडून कुणीही अपील केली नाही. त्यानंतर रिप्ले दाखवण्यात आला. या रिप्लेमध्ये तांझिदच्या पॅडला बॉल आधी लागल्याच स्पष्ट झालं. टीम इंडियाने अशा प्रकारे संधी गमावली. त्यामुळे तांझिदने या संधीचं सोनं केलं आणि चांगलाच फायदा करुन घेतला. तांझिदने 41 बॉलमध्ये अर्धशतक केलं. तसेच सलामी जोडीने 92 धावांची भागीदारी केली. मात्र तांझिदला अर्धशतकानंतर फार वेळ टिकता आलं नाही.
टीम इंडियाची घोडचूक
India miss their first chance by not appealing for this LBW! #INDvBAN #CWC23 #CWC23INDIA pic.twitter.com/vERAdwoAtX
— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) October 19, 2023
कुलदीप यादव याने टीम इंडियाला पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत तांझिदचा काटा काढला. कुलदीपने तांझिदला 51 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केलं. तांझिदने 43 बॉलमध्ये 5 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने 51 धावा केल्या. थोडक्यात काय, तर टीम इंडियाला तो तांझिद आऊट असल्याचं लक्षात आलं असतं तर बांगलादेशला पहिला झटका लवकर लागला असता. दरम्यान तांझिद 51 धावांवर आऊट झाल्याने टीम इंडियाला 45 धावांचा मोठा फटका सहन करावा लागला आहे. आता टीम इंडियाला ही चूक आणखी किती महागात पडते हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), लिटॉन दास, तंझिद हसन, मेहदी हसन मिराज, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान आणि शरीफुल इस्लाम.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.